सेवाधाम ट्रस्ट चे संस्थापक डॉ. एस. व्ही. गोरे यांचे निधन 

पुणे : मनोज क्लिनिक (पेरूगेट ) तसेच पुणे जिल्ह्यातील आदिवासी भागात ५० वर्ष आरोग्यसेवा देणाऱ्या  मावळमधील सेवाधाम ट्रस्ट चे संस्थापक डॉ. एस. व्ही. गोरे (वय ८६) यांचे कोरोना मुळे निधन झाले. डॉ. के. बी. वाढोकर यांच्या समवेत  त्यांनी आरोग्य आणि सामाजिक क्षेत्रात योगदान दिले.

मावळ ,खेड ,जुन्नर ,आंबेगाव तालुक्यात त्यांनी कुष्ठरोग निर्मूलनाचेही काम केले होते . एड्स निर्मूलनाच्या कामात सेवाधाम ट्रस्ट ही राज्याच्या स्वयंसेवी संस्थांची शिखर संस्था म्हणून कार्यरत होती . राज्य शासनाने आदिवासी सेवक ‘पुरस्कार देऊन त्यांचा सत्कार केला होता. मावळ मध्ये माळेगाव येथे निवासी आश्रमशाळाही त्यांनी चालवली होती . सर्वोत्कृष्ट आश्रमशाळेसाठीचा राज्य शासनाचा पुरस्कार या शाळेला मिळाला होता .डॉ गोरे यांच्या निधनाबद्दल सेवाधाम ट्रस्ट च्या विश्वस्त माया प्रभुणे , उत्तम झगडे यांनी दुःख व्यक्त केले . 

Leave a Reply

%d bloggers like this: