पंढरपूर पोटनिवडणुकीत १० उमेदवारांना ‘नोटा’ पेक्षा कमी मते; तर अभिजित बिचुकलेला १३७ मते

पंढरपूर – राष्ट्रवादीचे भारत भालके यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या पंढरपूर मंगळवेढा विधानसभेच्या पोटनिवडणुकीत भाजपचे समाधान अवताडे यांनी १ लाख ९ हजार ४५० मते घेऊन राष्ट्रवादीचे भगीरथ भालके यांचा पराभव केला आहे. या निवडणुकीत १९ उमेदवार रिंगणात होते. त्यात १० उमेदवारांना ‘नोटा’पेक्षाही कमी मते पडली आहेत. सर्वाधिक कमी म्हणजे फक्त ६९ मते डॉ. राजाराम कोंडीबा भोसले यांना पडली आहेत. तर अभिजित बिचुकले यांना १३७ मते पडली आहेत.

पंढरपूर निवडणुकीत १९ उमेदवार रिगणात होते. यासह ‘नोटा’चे एक बटन होते. १९ उमेदवार रिंगणात असले तरी, खरी लढत राष्ट्रवादी व भाजप यांच्यातच झाली. या निवडणुकीत उपमुख्यमंत्री अजित पवार, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, धनंजय मुंडे, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर आदींच्या सभा झाल्या होत्या. त्यामुळे या निवडणुकीत संपूर्ण राज्याचे लक्ष लागले होते. त्यात भाजपचे अवताडे यांचा तीन हजार ७३३ मतांनी विजय झाला आहे. भालके यांना १ लाख ५ हजार ७१७ मते मिळाली आहेत. या निवडणुकीत १९ पैकी १० उमेदवारांना ‘नोटा’पेक्षाही कमी मते पडली आहेत. त्यात १०० पेक्षाही काई मते पडलेले दोन उमेदवार आहेत. नोटाला ५९९ मते पडली आहेत.

नोटापेक्षा कमी मते पडलेले उमेदवार (कंसात पडलेली मते) संदीप जनार्दन खरात (५००), बिरदेव सुखदेव पापरे (४१२), नागेश प्रकाश पवार (२०६), सुदर्शन रामचंद्र खंदारे (११४), कपिल शंकर कोळी (९४), अभिजित वामनराव बिचुकले (१३७), ऍड. सीताराम मारुती सोनावळे (१३६), डॉ. राजाराम कोंडीबा भोसले (६९), संजय नागनाथ माने (२७२) व सिध्येश्वर भारत आवारे (४६९).

Leave a Reply

%d bloggers like this: