कोरोना – राज्यात आज ५९ हजार रुग्णांना डिस्चार्ज; १२ जिल्ह्यात रुग्णांच्या संख्येत घट

मुंबई – राज्यात गेल्या काही दिवसांपासून कोरोना रुग्णसंख्येत झपाट्याने वाढ होत आहे. गेल्या २४ तासांत ४८ हजार ६२१ नवे रुग्ण सापडले आहेत. तर तब्बल ५९ हजार ५०० रुग्णांना घरी सोडण्यात आले आहे. राज्यात आज 567 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

आजच्या आकडेवारीसह राज्यातील एकूण कोरोनामुक्त झालेल्यांची संख्या 40 लाख 41 हजार 158 झाली आहे. तर रुग्ण बरे होण्याचं प्रमाण 84.7 टक्क्यांवर पोहोचलं आहे. तर एकूण कोरोना रुग्णांची संख्या 47 लाख 71 हजार 22 वर पोहोचली आहे. राज्यात सध्या 39 लाख 8 हजार 491 जण होम क्वारंटाईन आहेत. तर 28 हजार 593 जण संस्थात्मक क्वारंटाईन आहेत. राज्यात सध्याच्या स्थितीत 6 लाख 56 हजार 870 सक्रिय रुग्णांवर उपचार सुरु असल्याची माहिती आरोग्य विभागाकडून देण्यात आली आहे.

महाराष्ट्रातील 12 जिल्ह्यातील कोरोना रुग्णांच्या संख्येत काहीशी घट पाहायला मिळत आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्यात कडक लॉकडाऊनची घोषणा केल्यानंतर गेल्या 15 दिवसांत ही रुग्णसंख्या घटल्याचं पाहायला मिळत आहे. त्यामुळे कोरोना संकटाच्या काळात नागरिक, राज्य सरकार आणि आरोग्य यंत्रणेला काहीसा दिलासा मिळण्याची शक्यता आहे.

राज्यातील ज्या 12 जिल्ह्यांमधील कोरोना रुग्णांच्या संख्येत घट झाली आहे, त्यात औरंगाबाद, भंडारा, धुळे, गोंदिया, जळगाव, लातूर, मुंबई, मुंबई उपनगर, नांदेड, नंदुरबार, ठाणे, वाशिम या जिल्ह्यांचा समावेश आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत या जिल्ह्यांमध्ये रुग्णसंख्या मोठ्या प्रमाणात वाढत होती. तसंच मृत्यूच्या प्रमाणातही वाढ झाल्याचं पाहायला मिळत होतं. मात्र आता या जिल्ह्यांमध्ये कोरोना रुग्णांच्या संख्येत घट दिसून येत असल्याचं राज्याला दिलासा मिळण्याची शक्यता आहे.

पुणे शहर कोरोना अपडेट्स

  • दिवसभरात २५७९ पाझिटिव्ह रुग्णांची वाढ.
  • दिवसभरात ४०४६ रुग्णांना डिस्चार्ज.
  • पुण्यात करोनाबाधीत ७९ रुग्णांचा मृत्यू. १८ रूग्ण पुण्याबाहेरील.
  • १४११ क्रिटिकल रुग्णांवर उपचार सुरू आहेत.
  • पुण्यात एकूण पॉझिटिव्ह रूग्णसंख्या ४३०२१०.
  • पुण्यातील ॲक्टिव्ह रुग्ण संख्या- ४०७०१.
  • एकूण मृत्यू -६९९१.
    -आजपर्यंतचे एकूण डिस्चार्ज ३८२५१८.
  • आज केलेल्या नमुन्यांची (स्वॅब) तपासणी- १२२७६.

Leave a Reply

%d bloggers like this: