Thursday, September 3, 2026
NATIONAL

भारतातून ब्रिटनला जाणारी विमानसेवा रद्द

नवी दिल्ली – भारतात सध्या कोरोना रुग्णसंख्या प्रचंड वेगानं वाढत असून, अनेक राज्यांमध्ये संचारबंदी, कडक निर्बंध लागू करण्याची वेळ आली आहे. ब्रिटनमध्येही (UK) कोरोनाचे रुग्ण वाढत असल्यानं ब्रिटननं आंतरराष्ट्रीय विमान उड्डाणांबाबत नवीन निर्बंध जारी केले आहेत. या पार्श्वभूमीवर भारतीय हवाई वाहतूक कंपनी एअर इंडियानं 24 ते 30 एप्रिल दरम्यानची ब्रिटनला जाणारी आणि येणारी आपली सर्व उड्डाणं रद्द केली आहेत. कंपनीनं बुधवारी याबाबत माहिती दिली.

या वेळी आठवड्यातून एकदा ब्रिटनसाठी विमान फेरी चालवण्याचा कंपनी विचार करत असून त्याबाबतची प्रक्रिया सुरू असल्याचं कंपनीनं म्हटलं आहे. या बाबतीतली ताजी माहिती वेबसाइट आणि सोशल मीडियावर उपलब्ध होईल, असंही कंपनीनं कळवलं आहे.

एअर इंडियानं 24 ते 30 एप्रिल दरम्यानची भारत आणि ब्रिटन यांच्यामधील सर्व विमान उड्डाणे रद्द केली असून नवीन वेळापत्रक आणि परताव्यासंदर्भात लवकरच माहिती दिली जाईल, असं कंपनीनं म्हटलं आहे. एएनआय या वृत्तसंस्थेच्या वृत्तानुसार, एअर इंडिया 24 ते 30 एप्रिल दरम्यान दिल्ली आणि मुंबईहून ब्रिटनला आठवड्यातून एकदा उड्डाण करण्याची तयारी करत आहे. याबाबतची अधिक माहिती वेबसाइट आणि सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर उपलब्ध असेल, असंही कंपनीनं म्हटलं आहे.

‘नुकत्याच ब्रिटननं जाहीर केलेल्या निर्बंधामुळे 24 ते 30 एप्रिल दरम्यान भारतातून ब्रिटनला जाणारी आणि तिथून येणारी विमान उड्डाणे रद्द करण्यात आली असून, या कालावधीत प्रवासाचे नियोजन असलेल्या प्रवाशांनी याची नोंद घ्यावी. ज्या प्रवाशांनी या काळातील एअर इंडियाच्या विमानाचे तिकीट काढले होते, त्यांना परतावा देण्याबाबत तसंच प्रवासाच्या पुढील तारखांबाबत लवकरच माहिती दिली जाईल, असं एअर इंडियानं स्पष्ट केलं आहे.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading