Saturday, May 30, 2026
MAHARASHTRAPUNETOP NEWS

कोरोना – राज्यात बुधवारी 67 हजार 436 नवीन रुग्ण

मुंबई – राज्यातील कोरोनाबाधितांचा आकडा दिवसेंदिवस वाढत जात असताना आजही राज्यात सर्वाधिक रुग्णांची वाढ झाली आहे. गेल्या २४ तासांत तब्बल ६७ हजार ४६८ नव्या बाधितांची नोंद झाली आहे ५४ हजार ९८५ कोरोनाबाधित रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला. आतापर्यंत एकूण 32 लाख 68 हजार 449 रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. राज्यात एकूण 6 लाख 95 हजार 747 अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण आता 81.15 टक्के झाले आहे.

राज्यात आज एकूण 568 रुग्णांचा आज मृत्यू झाला आहे. सध्या मृत्यूदर 1.54 टक्के आहे. आतापर्यंत एकूण 61 हजार 911 कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. आज नोंद झालेल्या 568 मृत्यूंपैकी 303 मृत्यू मागील 48 तासातील आहेत. तर 160 मृत्यू मागील आठवड्यातील आहेत. उर्वरित 105 मृत्यू हे एक आठवड्यापेक्षा अधिक कालावधीतील आहेत.

वाचा – घाबरू नका! लस अगदी सुरक्षित, केंद्र सरकारने दिला पुरावा

मुंबईत गेल्या 24 तासात 7654 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद

मुंबईत गेल्या 24 तासांत 7654 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. आतापर्यंत बरे झालेल्या एकूण रुग्णांची संख्या 5 लाख 4 हजार 466 वर पोहोचली आहे. सध्या 83 हजार 450 एकूण सक्रिय रुग्ण आहेत.

पुणे कोरोना अपडेट

  • दिवसभरात ५५२९ पॉझिटिव्ह रुग्णांची वाढ.
  • दिवसभरात ६५३० रुग्णांना डिस्चार्ज.
  • पुण्यात करोनाबाधीत ५६ रुग्णांचा मृत्यू. २२ रूग्ण पुण्याबाहेरील.
  • १३१४ क्रिटिकल रुग्णांवर उपचार सुरू आहेत.
  • ६२३५ रुग्ण ऑक्सिजनवर आहेत.

-एकूण पॉझिटिव्ह रूग्णसंख्या ३८२४९१

  • ॲक्टिव्ह रुग्ण संख्या- ५१९२०
  • एकूण मृत्यू -६२७४

-आजपर्यंतच एकूण डिस्चार्ज ३२४२९७

  • आज केलेल्या नमुन्यांची (स्वॅब) तपासणी- २४४०९

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading