Thursday, September 3, 2026
PUNE

देशभक्त केशवराव जेधे यांना वंशजांतर्फे अभिवादन

पुणे :  महाराष्ट्राच्या सामाजिक-राजकीय-सांस्कृतिक जीवनात आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटवणारे, सत्यशोधक चळवळीचे नेते, जेष्ठ स्वातंत्र्यसैनिक आणि भारताच्या घटना समितीचे सदस्य देशभक्त केशवराव जेधे यांच्या १२५ व्या जयंतीनिमित्त त्यांच्या वंशजांनी स्वारगेट चौकातील केशवराव जेधे यांच्या पूर्णाकृती पुतळ्याला पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले. 
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अत्यंत मोजक्या मान्यवरांच्या उपस्थितीत व शासनाचे सर्व नियम पाळून अभिवादन करण्यात आले.

यावेळी पुणे शहर कॉंग्रेसचे अध्यक्ष रमेश बागवे, महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेस कमिटीचे सरचिटणीस रोहित टिळक, पुणे शहर युवक कॉंग्रेस उपाध्यक्ष सौरभ अमराळे, फाऊंडेशनचे युवा कार्यकर्ते केशवराव जेधे यांचे पणतू कान्होजी दयानंद जेधे, रायभान जेधे, विरेन जेधे, अक्षय माने आदी उपस्थित होते. 
रमेश बागवे म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळापासून स्वराज्यासाठी आणि स्वातंत्र्यपूर्व ब्रिटीश कालखंडात स्वातंत्र्यासाठी जेधे घराण्याचे मोठे योगदान आहे. देशाला संविधान असावे, याकरीता स्थापलेल्या घटना समितीवर केशवराव जेधे हे सदस्य होते. त्यानंतर त्यांनी शेतकरी कामगार पक्षाची देखील स्थापना केली. केशवराव जेधे हे शिक्षक, पत्रकार, संपादक, कवी, लेखक, लोकनेते, सत्यशोधक व शाहीर असे अष्टपैलू व्यक्तिमत्व होते. 


रोहित टिळक म्हणाले, कॉंग्रेसचा पाया अधिक व्यापक करणारे आणि बहुजन समाजाला बळकट नेतृत्व देणारे असे केशवराव जेधे हे व्यक्तिमत्व होते. कॉंग्रेसचा प्रसार व्हावा व प्रभाव वाढावा, याकरीता त्यांनी महाराष्ट्राचा ग्रामीण भाग पिंजून काढला होता. महाराष्ट्र कॉंग्रेसचा पाया विस्तारुन त्यांनी भक्कम केला व या अनुषंगाने राजकारणही तळागाळापर्यंत नेले. संयुक्त महाराष्ट्राच्या लढयातील ते अग्रणी होते.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading