‘बार्टी’मार्फत अनुसूचित जातीच्या उमेदवारांना यूपीएससी चाचणी परीक्षा २०२० साठी आर्थिक सहाय्य योजना

मुंबई, दि. 1 : महाराष्ट्र राज्यातील अनुसूचित जातीचे जे उमेदवार केंद्रीय  लोकसेवा आयोग- नागरी सेवा  व्यक्तिमत्व चाचणी 2020 साठी पात्र ठरले आहेत अशा उमेदवारांना एकरकमी आर्थिक सहाय्य प्रदान करण्यासाठी आर्थिक सहाय्य योजना पुढीलप्रमाणे आहे.

योजनेचे स्वरूप :- पात्र अनुसूचित जातीच्या उमेदवारांना एकरकमी रक्कम रु. 25,000/- आर्थिक सहाय्य बार्टीमार्फत दिले जाईल.

पात्रता :-

  1. उमेदवार महाराष्ट्रातील रहिवासी व अनुसूचित जातीचा असावा.
  2. उमेदवार केंद्रीय लोकसेवा आयोग नागरी सेवा व्यक्तिमत्व चाचणी परीक्षा-2020 करिता पात्र असावा.

अर्ज करण्यासाठी-

  1. बार्टीच्या संकेतस्थळावरील फॉर्म भरावा.
  2. अर्जासोबत जातीचा दाखला, जात वैधता प्रमाणपत्र, डोमेसाईल प्रमाणपत्र, DAF, उमेदवारांचे बँक खाते क्र. (पासबुकच्या प्रथम पृष्ठाची प्रत) व त्यासोबत संघ लोकसेवा आयोग- नागरी सेवा मुख्य परीक्षा 2020 चे प्रवेश पत्र (Admit Card) इ. च्या स्व-साक्षांकित प्रती अपलोड कराव्यात. कागदपत्र स्व-साक्षांकित असणे बंधनकारक आहे.
  3. फॉर्म भरण्याचा अंतिम दिनांक- दि. 20 एप्रिल 2021. पात्र उमेदवारांनी अधिक माहिती साठी ०२०-२६३४ ३६00/२६३३ ३३३९ येथे संपर्क साधावा.

फॉर्म करण्यासाठी लिंक- http://barti.maharashtra.gov.in NOTICE BOARD> BARTI-UPSC-Civil Services Personality Test 2020 Online Application Form

बार्टी मार्फत पात्र विद्यार्थ्यांसाठी Mock Interview घेतले जाईल. याबाबत सविस्तर सूचना ई-मेल द्वारे कळविण्यात येईल असे बार्टीमार्फत प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळविण्यात आले आहे.

Leave a Reply

%d bloggers like this: