राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्यावर यशस्वी बायपास शस्त्रक्रिया

नवी दिल्ली – देशाचे राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्यावर दिल्लीतील एम्स रुग्णालयात यशस्वी बायपास शस्त्रक्रिया करण्यात आली आहे. देशाचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी ट्विट करून याबाबत माहिती दिली. तसेच मंगळवारी राष्ट्रपतींच्या हृदयावर यशस्वी शस्त्रक्रिया झाली असून सध्या त्यांची प्रकृती स्थिर आहे, असे राष्ट्रपती भवनातून जारी करण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे.

दरम्यान, रामनाथ कोविंद यांना छातीत दुखू लागल्याने शुक्रवारी लष्कराच्या रुग्णालयात तपासणीसाठी नेण्यात आले होते. त्यानंतर शनिवारी त्यांना एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आले आणि मंगळवारी सकाळी त्यांच्या हृदयावर यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आली. शस्त्रक्रियेनंतर आता त्यांची प्रकृती स्थिर असून तज्ज्ञ डॉक्टरांच्या पथकाचे त्यांच्या प्रकृतीवर बारकाईने लक्ष आहे, असेही निवेदनात म्हटले आहे.

Leave a Reply

%d bloggers like this: