Saturday, June 13, 2026
MAHARASHTRATOP NEWS

शरद पवारांची तब्येत पुन्हा बिघडल्याने रुग्णालयात दाखल; आजच शस्त्रक्रिया होणार

मुंबई – राष्ट्रवादी कांग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना पुन्हा पोटात दुखू लागल्याने ब्रिच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. शरद पवार यांना उद्या ३१ मार्चला रुग्णालयात दाखल केलं जाणार होतं. उद्या त्यांच्यावर शस्त्रक्रिया केली जाणार आहे. रविवारी पोटात दुखू लागल्यामुळे रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. तपासणीनंतर ३१ मार्चला म्हणजेच उद्या शस्त्रक्रिया करण्याचा सल्ला देण्यात आला होता.

आज पुन्हा एकदा पोट दुखीचा त्रास जाणवल्याने शरद पवार यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. शस्त्रक्रिया उद्या केली जाणार असल्यामुळे शरद पवार यांना उद्या रुग्णालयात दाखल करण्यात येणार होतं. मात्र, शरद पवार यांना आज दुपारी पोटदुखीचा त्रास सुरू झाला होता. त्यामुळे ब्रीच कँडी रूग्णालयातील डॉक्टरांनी घरी येऊन त्यांची तपासणी केली. त्यानंतर त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. त्यांच्यावर आजच शस्त्रक्रिया केली जाणार असल्याचे समजते.

शरद पवारांच्या पोटात दुखू लागल्याने त्यांना रविवारी ब्रीच कॅण्डी रुग्णालयात दाखल करण्यात आल होतं. यावेळी डॉक्टरांनी त्यांची तपासणी केल्यानंतर त्यांना पित्ताशयाचा त्रास असल्याचं निदान झालं. त्यामुळे पवार यांना ३१ मार्चला रुग्णालयात दाखल करण्यात येणार होतं. शरद पवारांवर एण्डोस्कोपी आणि शस्त्रक्रिया केली जाईल, अशी माहिती नवाब मलिक यांनी दिली.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading