पोलीस आयुक्त हेमंत नगराळे अॅक्शन मोडमध्ये, मुंबई पोलिसांचे ऑपरेशन ऑल आऊट

मुंबई – सचिन वाझे प्रकरणानंतर मुंबईच्या पोलीस आयुक्तपदावरून परमबीर सिंग यांची उचलबांगडी करण्यात आल्यांनतर त्यांच्या ऐवजी हेमंत नगराळे यांना मुंबईच्या पोलीस आयुक्तपदी नियुक्ती करण्यात आली आहे. यानंतर नवनियुक्त मुंबई पोलीस आयुक्त हेमंत नगराळे चांगलेच अॅक्शन मोड पाहायला मिळत आहे.

उत्तर मुंबई गुन्हेगारीमुक्त करण्यासाठी हेमंत नगराळे अॅक्शन मोडमध्ये आले आहेत. हेमंत नगराळे यांनी उत्तर मुंबई येथील विविध पोलिस ठाण्यांची भेट घेतली आहे. यावेळी त्यांनी पोलिसांच्या सर्व समस्या जाणून घेतल्या. यावेळी त्यांनी पोलीस उपायुक्त परिमंडळ १२ च्या नूतनीकरणाचे उद्घाटन केले. हेमंत नगराळे यांच्यासोबत पोलीस उपआयुक्त डी. एस. स्वामी, पोलीस सहआयुक्त विश्वास नांगरे पाटीलही उपस्थित होते.

मुंबई पोलीस आयुक्त हेमंत नगराळे, विश्वास नांगरे पाटील, सह पोलीस आयुक्त यांच्या मार्गदर्शनाखाली धुलिवंदन, शब ए बारात आणि शिवजयंतीच्या अनुषंगाने मुंबई पोलिसांनी रविवारी रात्री ऑपरेशन ऑल आऊट राबवले गेले. यादरम्यान पोलिसांनी मुंबईत २५५ ठिकाणी कोम्बिंग ऑपेरेशन करुन १२६७ रेकॉर्डवरील आरोपींची चौकशी केली.

फरार असलेल्या ३१ आरोपींना पोलिसांनी गजाआड केले. तर अमली पदार्थाची तस्करी आणि व्यसन करणाऱया ९३ जणांवर पोलिसांनी गुन्हे दाखल करून तिघांकडून १०५० ग्रॅम अमली पदार्थ जप्त केले. या ऑपेरेशन दरम्यान पोलिसांनी अवैध शस्त्र बाळगणाऱया ३८ जणांवर कारवाई करत ४ जणांकडून पोलिसांनी अग्निशस्त्र जप्त केले.

Leave a Reply

%d bloggers like this: