परभणी गटसाधन केंद्राला शिक्षक संघटनाकडून महापुरुषांच्या प्रतिमा भेट

परभणी, दि. २५ – शिक्षणासारख्या पवित्र क्षेत्रात महापुरुषांच्या विचारांचा सुगंध दरवळत राहण्यासाठी प्रतिमारुपी सहवास मदत करत असतो.स्वच्छ व सुंदर कार्यालयाअंतर्गत गट शिक्षणाधिकारी मा.मंगेश नरवाडे साहेबांनी केलेल्या सुंदर क्रियेस तितकीच सुंदर प्रतिक्रिया येणे अपेक्षित होते. कास्ट्राईब शिक्षक संघटनेचे परभणी तालुकाअध्यक्ष.प्रकाश पंडीत व तालुका कार्याध्यक्ष देवानंद फुलवरे यांनी समन्वयाची भूमिका पार पाडून तालुक्यातील व जिल्ह्यातील चौदा शिक्षक संघटनांनी पंधरा महापुरुषांच्या प्रतिमा आज सहृदय भेट दिल्या.

कास्ट्राईब शिक्षक संघटनेच्या तालुका व जिल्हा शाखेसह शिक्षण महर्षी डॉ.पंजाबराव देशमुख शिक्षक परिषद तालुका शाखा परभणी,महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक परिषद तालुका शाखा परभणी,महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघ तालुका शाखा परभणी,प्राध्यापक-शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी विंग(प्रोटान) जिल्हा शाखा परभणी,महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक-पदवीधर व केंद्रप्रमुख सभा जिल्हा शाखा परभणी,डॉ.पंजाबराव देशमुख राष्ट्रीय शिक्षक परिषद जिल्हा शाखा परभणी,आदर्श शिक्षक समिती जिल्हा शाखा परभणी,क्रिडा व शारीरिक शिक्षण शिक्षक महासंघ जिल्हा शाखा परभणी,महाराष्ट्र राज्य शिक्षक सेना जिल्हा शाखा परभणी,प्राथमिक शिक्षक संघ( मा.आ.शिवाजीराव पाटील गट) जिल्हा शाखा परभणी,महाराष्ट्र राज्य उर्दु शिक्षक संघटना जिल्हा शाखा परभणी,महाराष्ट्र राज्य राष्ट्रवादी शिक्षक संघटना जिल्हा शाखा परभणी,सावित्रीबाई फुले महिला शिक्षक संघटना जिल्हा शाखा परभणी या शिक्षक संघटनांनी प्रतिमा भेट देउन महापुरुषांचे विचार शिक्षण क्षेत्रातील प्रत्येक घटकात रुजलेले आहेत याचीच जणू जाणीव करून दिली.

परभणी गट साधन केंद्राचे गटशिक्षणाधिकारी मंगेश नरवाडे यांच्या उपस्थितीत पार पडलेल्या आजच्या कार्यक्रास कार्यालयीन अधिक्षक नांदे, आरोग्य विभागाचे कार्यालयीन अधिक्षक उमेश गायकवाड, कास्ट्राईब शिक्षक संघटनेचे विभागीय अध्यक्ष.सतीश कांबळे, कास्ट्राईबचे जिल्हाअध्यक्ष दिपक पंडीत, महाराष्ट्र राज्य शिक्षक सेनेचे जिल्हाअध्यक्ष सुनिल काकडे, राष्ट्रवादी शिक्षक संघटनेचे जिल्हा अध्यक्ष सुभाष शेंगुळे, महाराष्ट्र राज्य उर्दु शिक्षक संघटनेचे जिल्हा अध्यक्ष अब्दुल मन्नान, जिल्हा सचिव खान युसुफ एजाज, प्राथमिक शिक्षक संघाचे (मा.शिवाजीराव पाटील गट) जिल्हा सचिव युवराज अंधारे ,टाकळी कुंभकर्ण केंद्राचे केंद्रप्रमुख देवानंद वाघमारे,समन्वयक प्रकाश पंडीत, देवानंद फुलवरे, विशाल प्रधान, विशाल कांबळे, नितीन डावरे यासह इतर कर्मचारी उपस्थित होते.

Leave a Reply

%d bloggers like this: