Saturday, June 13, 2026
TECHNOLOGY

रिअलमीने स्मार्टफोनची नवी शृंखला सादर केली

पुणे:  रिअलमीने ग्राहकांना उत्तम दर्जाच्या कॅमेराचा अनुभव देण्यासाठी रियलमी ८ प्रो ही शृंखला सादर केली आहे. या स्मार्टफोनच्या शृंखलाची किंमत ही पंधरा हजारांपेक्षा कमी आहे. या सिरीजमध्ये रिअलमी ८ प्रो व रिअलमी ८ या दोन स्मार्टफोनचा समावेश आहे. तसेच कंपनीने रिअलमी स्मार्ट स्केल, रिअलमी स्मार्ट बल्ब ही उत्पादने पण बाजारात सादर केली आहे. रिअलमी ८ प्रो, हा एमपी अल्ट्रा क्वाड कॅमेराने सुसज्ज असलेला पहिला रिअलमी स्मार्टफोन आहे. हा स्मार्टफोन क्वालकॉम स्नॅपड्रॅगन ७२० जीद्वारा समर्थित आहे. तसेच रिअलमी ८ प्रोमध्ये अल्ट्रा-फास्ट इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट स्कॅनरसह ६.४इंच (१६.३ सेमी) सुपर एमोलेड फुलस्क्रीन आहे. ५० डब्ल्यू सुपरडार्ट चार्जे, रिअलमी यूआय २.0, स्लिम डिझाइन या सुविधा आहेत. हा स्मार्टफोन दोन स्टोरेज मॉडेल्समध्ये उपलब्ध आहे. या  स्मार्टफोनच्या  ६ जीबी + १२८ जीबी मॉडेलची किंमत रु. १७,९९९ आहे.  तर ८ जीबी + १२८ जीबी मॉडेलची किंमत रु. १९,९९९ आहे. हा स्मार्टफोन २५ मार्चपासून फ्लिपकार्ट, रिअलमी डॉट कॉमवर  विक्रीसाठी उपलब्ध असेल.

रियलमी ८ मध्ये ६४ एमपी एआय क्वाड कॅमेरा आणि ६.४ इंचाची (१६.३ सेमी) सुपर एमोलेड फुलस्क्रीन आहे. शिवाय या स्मार्टफोनमध्ये ३0 डब्ल्यू डार्ट चार्जसह अल्ट्रा-फास्ट इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट स्कॅनर व  पाच हजारा एमएएच बॅटरी देखील आहे. हा स्मार्टफोन मीडियाटेक हेलियो जी ९५ गेमिंग प्रोसेसरद्वारा समर्थित आहे. हा फोन तीन स्टोरेज मॉडेलमध्ये उपलब्ध असेल. या स्मार्टफोनच्या   ४ जीबी + १२८ जीबी मॉडेलची ही किंमत १४,९९९ असेल. ६ जीबी + १२८ जीबी मॉडेलची किंमत ही रु. १५,९९९ आणि रु. १६,९९९ किंमत ही ८ जीबी + १२८ जीबी मॉडेलची असेल. हा स्मार्टफोन २५ मार्च रोजी दुपारी १२ वाजता फ्लिपकार्ट डॉट कॉम, रिअलमी डॉट कॉम, आणि मेनलाईन चॅनल्सवर विक्रीसाठी उपलब्ध असेल.

माधव शेठ, उपाध्यक्ष, व मुख्य कार्यकारी अधिकारी, रिअलमी इंडिया आणि युरोप म्हणाले की, कॅमेरा हा नेहमीच रिअलमीचा जमेची बाजू राहिली आहे. रिअलमी ८ प्रो हा एमपी अल्ट्रा क्वाड कॅमेर्‍याने सुसज्ज असलेला पहिला रिअलमी स्मार्टफोन आहे. रिअलमी ८ हा आमच्या वापरकर्त्यांना 64 एमपी एआय क्वाड कॅमेरा अनुभवण्याची संधी देईल, जो बहुतेक पारंपारिक स्मार्टफोन कॅमेरा प्रणालींपेक्षा एक पाऊल पुढे आहे.

शरीराचे वजन व्यवस्थापित करण्यासाठी रिअलमीने ट्रेलसेटिंग रिअलमी स्मार्ट स्केल सादर केली आहे. हे उत्पादन एक ट्रेंडी निळे आणि क्लासिक पांढर्या मॉडेलमध्ये उपलब्ध असेल, ज्याची किंमत रु. १९९९  आहे. हे उत्पादन ३0 मार्च  रोजी दुपारी   १२ वाजता फ्लिपकार्ट, रिअलमी डॉट कॉम, ॲमेझॉन आणि मेनलाइन स्टोअरमध्ये विक्रीसाठी उपलब्ध होईल.रिअलमीने स्मार्ट बल्ब देखील सादर केले आहे. रिअलमी स्मार्ट बल्ब १६ दशलक्ष रंगांना समर्थन देते आणि याचे दोन मॉडेल आहेत.  ९व्हॅट ब्लबची किंमत  ७९९ आणि १२  व्हॅटची किंमत रु. ९९९ आहे.   हे ब्लब  फ्लिपकार्ट, रिअलमी डॉट कॉम, ॲमेझॉन आणि लवकरच मेनलाईन स्टोअरमध्ये ३0 मार्चपा

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading