पहा जेठालालचे गाडा कुटूंब अॅनिमेटेड सिरीजमध्‍ये

हसवून-हसवून लोटपोट करणा-या “तारक मेहता का उलटा चष्मा” या लोकप्रिय मालिकेतील गाडा कुटुंब आता अॅनिमेटेड सिरीजमध्ये लहान मुलांना भेटायला येत आहे. किड्स टीव्‍ही चॅनेल सोनी येयने यंदा एप्रिलमध्‍ये “तारक मेहताका छोटा चष्मा” या नवीन सेगामेन्टमध्ये गोकुळधाम सोसायटीच्‍या धमाल सदस्‍यांसाठी रेड कारपेट सादर केले आहे. गोकुळधाममधील जेठालाल, दया, बापूजी व टप्‍पू हे सारे जण म्हणजे धमाल तर असणारच यांसह नवीन ट्विस्‍ट्स देखील असणार,जे लहान मुलांना अचंबित करतील.

पहिल्‍यांदाच नवीन कथांसह शो अनेक लक्षवेधक ट्विस्‍ट्स, अद्वितीय कथानक घेऊन येत आहे, जे उच्‍चस्‍तरीय मनोरंजनाची खात्री देतात. कोणत्‍याही गोष्‍टीची पर्वा न करणा-या पात्रांना जीवनाचा पुरेपूर आनंद देणारे हे धमाल व मैत्रीपूर्ण शेजारी अनेक अचंबित करणारे क्षण सादर करतील, जे रोमांचक साहसांनी भरलेले असतील. येय! विश्‍वाचे हे नवीन सदस्‍य लहान मुलांचे लक्ष वेधून घेण्‍यासोबत त्‍यांच्‍या मनामध्‍ये खास स्‍थान निर्माण करतील आणि टेलिव्हिजनवर नवीन आविष्‍कार सादर करतील.

Leave a Reply

%d bloggers like this: