मातोश्री रमाबाई आंबेडकर क्रिकेट स्पर्धांचे यशस्वी आयोजन

पुणे – युवा पिढीमध्ये वाढती व्यसनाधीनता तसेच गुन्हेगारी प्रवृत्तीपासून परावृत्त होऊन खेळांविषयी आवड निर्माण व्हावी, तसेच नवीन खेळाडू तयार होऊन राज्यस्तरीय, देशपातळीवर आणि आंतररष्ट्रीय पातळीवर सहभागी व्हावेत या उद्देशाने मातोश्री रमाबाई आंबेडकर प्रीमियर लीग क्रिकेट स्पर्धाचे नुकतेच आयोजन करण्यात आले होते.

धनंजय कांबळे, उमेश अभिमान गायकवाड आणि मित्रपरिवार, ए टी ग्रुप संतोष अमोल स्पोर्ट्स पी. वाय. एस स्पोर्ट्स यांच्या संयुक्त विद्यमाने यंदा पाचव्या वर्षी या क्रिकेट स्पर्धा घेण्यात आल्या. या क्रिकेट स्पध्रेत 44 संघांनी सहभाग घेतला. स्पर्धेचा बक्षीस समारंभ संयोजक धनंजय कांबळे , उमेश अभिमान गायकवाड, सोमनाथ पानगावे तसेच विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत झाला .खुल्या आणि स्थानिक या दोन गटांमध्ये स्पर्धा घेण्यात आली होती .खुल्या गटात रेल्वे काका इलेव्हन या संघाने विजेतेपद पटकावले तर उपविजेता संघ जॉन इलेव्हन ठरला.स्थानिक गटांमध्ये एनसीसी नायडू संघाने विजेतेपद पटकावले तर सम्राट अशोका इलेव्हन हा संघ उपविजेता ठरला .विजय संघाला प्रथम बक्षीस म्हणून रोख एकवीस हजार रुपये व आकर्षक चषक तर दुसरे बक्षीस अकरा हजार रुपये व आकर्षक चषक असे पारितोषिक मान्यवरांच्या हस्ते देण्यात आले .

स्पर्धेच्या यशस्वी संयोजनाबद्दल रणजी क्रिकेटपटू अजय चव्हाण यांच्यासह अनेक मान्यवरांनी अंतिम सामन्यासाठी उपस्थित राहून मार्गदर्शन केले. या बक्षीस वितरण समारंभाला मनसे नेते माजी नगरसेवक राजेन्द्र (बाबू) वागसकर ,नगरसेवक उमेश गायकवाड यांच्यासह दिनेश गायकवाड , यासीन शेख, प्रदीप देशमुख – माने, संतोष जाधव, प्रवीण कसाब, प्रशांत रणपिसे , नवनाथ पुजारी ,अमोल कांबळे, संदीप पाढले, आनंद सवाणे ,महिपाल वाघमारे सचिन शिंदे , शाम गायकवाड , निखिल गायकवाड , इक्बालभाई शेख ,शेखर धावडे ,अविनाश मोरे, सुजित यादव पाडळे ,आल्ताफ नदाफ ,निलेश गायकवाड, श्रीकांत जगताप, प्रीतम गाधले , दादा रणशिंग, राहूल तायडे, प्रदीप ओहोळ, मयूर गायकवाड, सोहन परदेशीं, रुपेश ओव्हाळ, समाधान शिंदे ,मुनावरभाई रामपुरी, शुभम चव्हाण, अमित वांटे, शुभम शिंदे, किसन भिसे, बाबू भिसे उपस्थित होते .

Leave a Reply

%d bloggers like this: