सरदार पटेल स्टेडियमचे नाव आता ‘नरेंद्र मोदी स्टेडियम’

अहमदाबाद – गुजरातच्या मोटेरा येथील सरदार वल्लभभाई पटेल स्टेडियमला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे नाव देण्यात आले आहे. स्टेडियमचे नामकरण नरेंद्र मोदी स्टेडियम असे करण्यात आले आहे. याच मैदानावर आजपासून भारत आणि इंग्लंड यांच्यातील तिसरा कसोटी सामना रंगणार आहे. डे-नाईट होणाऱ्या या पिंक बॉल क्रिकेट सामन्यासाठी जय्यत तयारी करण्यात आली असून सामना खेळवण्यापूर्वी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते स्टेडियमचे उद्घाटन करण्यात आले. या कार्यक्रमाला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, गुजरातचे राज्यपाल आचार्य देवव्रत, केंद्रीय क्रीडा मंत्री किरण रिजिजू आणि बीसीसीआयचे सचिव जय शाह उपस्थित होते. दरम्यान, हे मैदान मोटेरा स्टेडियम म्हणून ओळखले जात होते. त्यानंतर त्याची पुन्हा बांधणी करण्यात आली आणि त्याचे सरदार पटेल असे नामकरण करण्यात आले होते. त्यानंतर आता हे स्टेडियम नरेंद्र मोदी स्टेडियम या नावाने ओळखले जाणार आहे.

Leave a Reply

%d bloggers like this: