महालक्ष्मी मंदिरातील उत्सव मूर्तींची धान्यतुला व सोने-चांदी पुष्पअर्पण

पुणे : महालक्ष्मी मंदिरातील उत्सव मूतीर्ची धान्यतुला करुन ते धान्य अनाथ मुलांच्या संस्थेस देण्याचा उपक्रम श्री महालक्ष्मी मंदिरात पार पडला. बंगळुरु येथील पौरोहित्य करणा-या गुरुजींच्या हस्ते सोने-चांदी पुष्पअर्पण करुन देवीचरणी आरोग्यसंपन्न भारताकरीता प्रार्थना करण्यात आली.

श्री बन्सीलाल रामनाथ अग्रवाल धार्मिक व सांस्कृतिक ट्रस्ट, श्री महालक्ष्मी मंदिर सारसबागच्या ३७ व्या वर्धापनदिनानिमित्त आयोजित ब्रह्मोत्सवात मंदिरात विविध कार्यक्रम सुरु आहेत. यावेळी ट्रस्टचे प्रमुख संस्थापक विश्वस्त राजकुमार अग्रवाल, प्रमुख विश्वस्त अमिता अग्रवाल, विश्वस्त अ‍ॅड.प्रताप परदेशी, भरत अग्रवाल, तृप्ती अग्रवाल, नारायण काबरा, हेमंत अर्नाळकर, नगरसेवक प्रविण चोरबेले यांसह विश्वस्त उपस्थित होते.

राजकुमार अग्रवाल म्हणाले, सामाजिक कार्यक्रमांमध्ये मंदिरातील श्री महालक्ष्मी, श्री महासरस्वती, श्री महाकाली व श्री विष्णु यांच्या उत्सव मूतीर्ची धान्यतुला करुन ते धान्य अनाथ मुलांच्या संस्थेस वाटप करण्याचा उपक्रम यंदा राबविण्यात आला.

अमिता अग्रवाल म्हणाल्या, धान्यतुलेमध्ये विविध प्रकारचे धान्य, तेल, बिस्कीटे व खाऊ ठेवण्यात आला होता. ममता फाऊंडेशन या संस्थेला हे धान्य देण्यात आले. याशिवाय सोने व चांदीची फुले देखील मान्यवरांच्या हस्ते उत्सवमूर्तीला अर्पण करण्यात आली. मंदिराला आकर्षक पुष्पआरास देखील करण्यात आली होती.

Leave a Reply

%d bloggers like this: