PMP कोथरूड डेपो – बावधन, कोथरूड डेपो – रामनगर कॉलनी मार्गावर अटल बस सेवा सुरू

पुणे, दि. २५ – पीएमपीएमएल कडून फक्त ५ रुपयांत ५ किमी पर्यंत प्रवासी सेवा देणाऱ्या अटल बससेवा योजनेअंतर्गत मार्ग क्र. के-२१ कोथरूड डेपो-बावधन-कोथरूड डेपो (वर्तुळमार्ग) व मार्ग क्र. के-२१-ए कोथरूड डेपो-रामनगर कॉलनी-कोथरूड डेपो (वर्तुळमार्ग) या दोन नवीन बसमार्गांचा लोकार्पण सोहळा खासदार गिरीश बापट, आमदार भिमराव तापकीर, भाजप पुणे शहराध्यक्ष जगदिश मुळीक, पीएमपीचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक डॉ. राजेंद्र जगताप यांच्या शुभहस्ते पार पडला.

यावेळी नगरसेवक दिलीप वेडे-पाटील, नगरसेवक किरण दगडे-पाटील, नगरसेविका अल्पना वरपे, नगरसेविका श्रद्धा प्रभुणे-पाठक, सचिन दांगट-पाटील, पीएमपीएमएलचे वाहतूक व्यवस्थापक दत्तात्रय झेंडे, वाहतूक नियोजन व संचलन अधिकारी चंद्रकांत वरपे, कामगार व जनता संपर्क अधिकारी सतिश गाटे, कोथरूड आगार व्यवस्थापक चंद्रशेखर कदम यांची प्रमुख उपस्थिती होती.

मार्ग क्र. के-२१ या मार्गावरील बस कोथरूड डेपो- चांदणी चौक- मराठा मंदिर- एलएमडी चौक- टोयोटा शोरूम- चेलाराम हॉस्पिटल- डीएसके रानवारा- आयसीआयसीआय बँक चौक- डी पॅलेस चौक- अमर जवान चौक- कोथरूड डेपो या मार्गे जाईल. तर मार्ग क्र. के-२१ ए या मार्गावरील बस कोथरूड डेपो- चांदणी चौक- मराठा मंदिर- एलएमडी चौक- वैदेही सोसायटी- अमर जवान चौक- डी पॅलेस चौक- रामनगर कॉलनी- कोथरूड डेपो या मार्गाने जाईल. हि बससेवा दर २० मिनिटांनी असेल.
यावेळी बोलताना खासदार गिरीश बापट म्हणाले, सामान्य माणसाला खाजगी वाहनांचे भाडे परवडत नाही. पीएमपीएमएलने अटल बससेवेअंतर्गत फक्त ५ रुपये तिकीटदरात हे नवीन दोन बसमार्ग सुरू करून सामान्य माणसाला दिलासा दिला आहे.

Leave a Reply

%d bloggers like this: