fbpx
Thursday, April 25, 2024
MAHARASHTRAPUNE

सर्वोत्तम दिवाळी अंक पुरस्कार ‘मौज ‘ दिवाळी अंकाला जाहीर

पुण्यभूषण फाउंडेशन तर्फे सर्वोत्तम दिवाळी अंकासाठी १ लाखाचे पारितोषिक

पुणे, दि. २२ – पुण्यभूषण फाउंडेशन तर्फे आयोजित सर्वोत्तम दिवाळी अंक स्पर्धेचा निकाल आज जाहीर करण्यात आला.१ लाखाचे पारितोषिक ‘मौज ‘ या दिवाळी अंकाला जाहीर करण्यात आले.

राजहंस प्रकाशन पुरस्कृत सर्वोत्तम ललीत आणी वैचारिक लेखनासाठी अरुण खोपकर यांना ‘ दीपावली ‘अंकातील लेखनासाठी जाहीर करण्यात आला.पॉप्युलर प्रकाशन पुरस्कृत सर्वोत्तम कथा पुरस्कार जयंत पवार यांना ‘पद्मगंधा ‘ अंकातील कथेसाठी जाहीर झाला.वसंत आबाजी डहाके यांना वर्णमुद्रा प्रकाशन पुरस्कृत सर्वोत्तम कविता पुरस्कार ‘उद्याचा मराठवाडा ‘दिवाळी अंकातील कवितेसाठी जाहीर करण्यात आला. हे तिन्ही पुरस्कार प्रत्येकी ११ हजार रुपयांचे आहेत.

पुण्यभूषण फाउंडेशन चे संस्थापक डॉ सतीश देसाई,तसेच संजय भास्कर जोशी, महेंद्र मुंजाळ, वृषाली दाभोळकर यांनी सोमवारी पुणे श्रमिक पत्रकार संघात झालेल्या पत्रकार परिषदेत ही माहिती दिली.

दहा वाचन स्वयंसेवकांच्या प्राथमिक गुणांकनानंतर सदा डुंबरे, हरी नरके, नीरजा, संजय भास्कर जोशी, रेखा इनामदार -साने, नितीन वैद्य यांच्या निवड समितीने सर्व निवडी केल्या.१२६ अंक निवड समितीकडे आले होते.

हा पुरस्कार समारंभ मराठी दिनाच्या पूर्वसंध्येला म्हणजे २६ फेब्रुवारी २०२१ ला आयोजित करण्यात आला होता, मात्र, कोरोना साथीच्या पार्श्वभूमीवर हा सोहळा पुढे ढकलण्यात आला.

पुण्यभूषण फाउंडेशन चे संस्थापक डॉ सतीश देसाई म्हणाले, ‘
मराठी अस्मितेचे एक सांस्कृतिक केंद्र अशी मराठी दिवाळी अंकांच्या शंभराहून अधिक वर्षाच्या परंपरेची ओळख सांगता येईल. अशा या वैभवशाली परंपरेला पुन्हा एकदा देदीप्यमान स्वरूप प्राप्त व्हावे म्हणून उत्तमोत्तम दर्जेदार दिवाळी अंकांना प्रोत्साहन देण्यासाठी या वर्षापासून पुण्यभूषण फाऊंडेशन तर्फे दर वर्षी सर्वोत्तम दिवाळी अंकास एक लाख रुपये आणि सुवर्णमुद्रांकित प्रशस्तीपत्र असा पुरस्कार देण्याचे ठरवले . पुढील किमान १० वर्षे हा पुरस्कार सातत्याने देण्यात येईल.

डॉ सतीश देसाई म्हणाले,’अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन, गेली ३२ वर्ष पुण्यभूषण पुरस्कार, २० वर्ष दिवाळी पहाट, १० वर्ष पुण्यभूषण दिवाळी अंक निर्मिती अशा दिमाखदार सांस्कृतिक परंपरा पुण्यभूषण फाऊंडेशन चालवत आहे. या वैभवशाली मराठी सांस्कृतिक परंपरेला पुढील अध्याय जोडण्यासाठी, मराठी वाचन -लेखन संस्कृती पुढे नेण्यासाठी ही पुरस्कार योजना सुरु केली आहे.

पुण्यातील श्रेष्ठ आणि ज्येष्ठ व्यक्तिमत्वास दिला जाणारा ‘पुण्यभूषण पुरस्कार’ ज्याप्रमाणे एक मानदंड झाला आहे तसाच हा ‘पुण्यभूषण दिवाळी अंक पुरस्कार’ एक मानदंड ठरेल . संजय भास्कर जोशी म्हणाले ल,' सर्वोत्तम अंक निवडण्याचे निकष जात, धर्म, प्रदेश, राजकीय विचारधारा या कोणत्याही बाबीचा विचार करणारे नसून केवळ साहित्य आणि कलामूल्ये यांचाच विचार केला गेला.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading