राष्ट्रीय बाल शौर्य पुरस्कार प्राप्त सोनित सिसोलकर याचा विशेष सन्मान

पुणे, दि. २१ – नऱ्हे येथील जाधवर ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटच्या पॅराडाईज इंग्लिश मिडीयम स्कूलमध्ये शिकणाºया सोनित सिसोलकर या विद्यार्थ्याला नुकताच केंद्र शासनाच्या वतीने राष्ट्रीय बाल शौर्य पुरस्कार जाहीर झाला. यानिमित्त जाधवर  ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटचे अध्यक्ष प्राचार्य डॉ.सुधाकर जाधवर आणि उपाध्यक्ष अ‍ॅड. शार्दुल जाधवर यांनी त्याचा सन्मान केला. तसेच त्याची वार्षिक फी देखील माफ करण्यात आली आहे. 
इन्स्टिटयूटच्या प्रांगणात नवनीत एज्युकेशन लि. चे कल्पेश शाह, मकरंद उत्पट आणि शिक्षकवर्ग यांच्या उपस्थित हा सन्मान करण्यात आला.

अ‍ॅड. शार्दुल जाधवर म्हणाले, सोनित सिसोलकर हा आमच्या शाळेत शिकणारा गुणवंत विद्यार्थी आहे. त्याला  शैक्षणिक प्रकल्पासाठी बाल शौर्य पुरस्कार मिळाला याचा आम्हाला अभिमान आहे. मंगळावरची माती लाल का झाली आणि झाडांच्या वाढीवर आवाजाचा परिणाम काय होतो याविषयी त्याने संशोधन केले आहे. शाळेच्या वतीने त्याला पुढील शैक्षणिक उपक्रमाच्या माध्यमातून सहकार्य केले जाईल, असेही त्यांनी सांगितले.

Leave a Reply

%d bloggers like this: