Breaking news पुण्यातील शाळा, कॉलेज 28 फेब्रुवारी पर्यंत बंद

पुणे, दि. २१ – वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पुण्यातील शाळा महाविद्यालय 28 फेब्रुवारी पर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. शहरातील हॉटेल रेस्टॉरंट रात्री अकरा वाजेपर्यंत सुरू ठेवण्यास परवानगी देण्यात आलीआ आहे. पुण्यात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.

कोरोना रुग्णांच्या कुटुंबातील व संपर्कात आलेल्या व्यक्तींचा प्रभावीपणे शोध घेऊन, लक्षणे असल्यास चाचणी करावी. तसेच ज्यांना लक्षणे नाहीत, त्यांच्यावर लक्ष ठेवा, अशा सूचना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी प्रशासनाला दिल्या आहे. पुण्यासह राज्यात कोरोना विषाणूच्या रुग्णांत वाढ होत आहे. त्यामुळे चिंता व्यक्त केली जात असून, पुणे जिल्हा आणि विभागातील कोरोना प्रादुर्भाव आणि त्यावर उपाययोजना याविषयी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी रविवारी सकाळी बैठक घेतली. त्यावेळी अजित पवार बोलत होते.

यावेळी कामगार मंत्री दिलीप वळसे-पाटील,पशुसंवर्धन राज्य मंत्री दत्तात्रय भरणे, खासदार वंदना चव्हाण, महापौर मुरलीधर मोहोळ, जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा निर्मला पानसरे पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या महापौर उषा ढोरे, विभागीय आयुक्त सौरभ राव, जिल्हाधिकारी डॉ. राजेशदेशमुख, पुणे मनपा आयुक्त विक्रमकुमार,पिंपरी-चिंचवड महापालिकेचे आयुक्त राजेश पाटील उपस्थित होते.

कोरोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी करण्यात येत असलेल्या उपाययोजना करा, हॉटस्पॉट भागात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढणार नाही, त्यासाठी आवश्यक त्या उपाययोजना करा, प्रतिबंधित क्षेत्रे (Containment Zone) निश्चित करा, आरोग्य कर्मचाऱ्यांमार्फत गृहभेटीद्वारे सुपर स्प्रेडर ब ILI /SARI रुग्णांचे सर्वेक्षण करण्याच्या सूचना अजित पवार यांनी केल्या आहेत. खासगी वैद्यकीय व्यावसायिक यांच्याकडे येणाऱ्या Flu सदृश्य रुग्णांची RTPCR तपासणी करावी, त्यासंदर्भात आरोग्य विभागाने सूचना द्यावी, नागरिकांना सर्व नियमांचे काटेकोरपणे पालन करावे, असे आवाहनही अजित पवार यांनी केले आहे.

पुण्याचे पालकमंञी तथा उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत कोरोना आढावा बैठक….

पुणे जिल्ह्यातील शाळा कॉलेज 28 फेब्रुवारी पर्यत बंद ठेवण्याचा निर्णय

विवाह सोहळ्याला 200 लोकांची उपस्थिती राहणार

विवाह सोहळ्यासाठी पोलिसांची परवानगी घेणं आवश्यक

खासगी, राजकीय कार्यक्रमांना देखील 200 लोकांची उपस्थितीला परवानगी

हॉटेल, लॉज, बार रेस्टॉरंट रात्री 11 वाजेपर्यंत सुरु राहणार

अत्यावश्यक सेवा वगळता रात्री 11 ते सकाळी 6 वाजेपर्यंत इतरांसाठी नियंत्रित संचार बंदी होणार?

Leave a Reply

%d bloggers like this: