कोरोना – देशात 24 तासांत 9,121 नवे रुग्ण!

नवी दिल्ली – भारतात कोरोना लसीकरण सुरू आहे, मात्र देशाची एकूण कोरोना रुग्णसंख्या 1 कोटीच्या पार गेल्याने चिंता प्रचंड वाढली आहे. त्यामुळे नागरिकांनी आपापली काळजी घेणे आवश्यक आहे. त्यातच देशात मागील 24 तासांत 9,121 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली असून 81 कोरोना रुग्णांनी आपला जीव गमावला आहे. यासह देशाची एकूण कोरोना रुग्णसंख्या आता 1,09,25,710 वर पोहोचली असून कोरोनाबळींचा आकडा 1,55,813 इतका झाला आहे. तसेच आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, काल दिवसभरात 11,805 जण कोरोनामुक्त झाल्याने देशात आतापर्यंत 1,06,33,025 व्यक्तींनी कोरोनावर यशस्वी मात केली आहे, तर सध्या 1,36,872 जण कोरोनावर उपचार घेत आहेत.

दरम्यान, भारतात कोरोनाचा शिरकाव झाल्यानंतर केंद्र सरकारकडून लॉकडाऊनची कडक अंमलबजावणी करण्यात आली होती. परंतु त्यानंतर अर्थव्यवस्था रुळावर आणण्यासाठी सुरू करण्यात आलेल्या अनलॉकच्या काळात रुग्णसंख्येने मोठी उसळी घेतली पण आता मात्र दिवसेंदिवस दिवसभरातील रुग्णसंख्या घटताना दिसत आहे. परंतु तरी देशातील एकूण रुग्णसंख्या 1 कोटीच्या पार गेल्याने चिंता वाढली आहे. तसेच ब्रिटनमध्ये आढळलेल्या नव्या कोरोना विषाणूने भारतातही शिरकाव केल्यामुळे सर्वांनी काळजी घेणे आवश्यक आहे.

Leave a Reply

%d bloggers like this: