मोफत नेत्र तपासणी शिबीर व चष्मे वाटप

पुणे, दि. १७ – श्री शिवाजीनगर गावठाण सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ ट्रस्ट आणि ए एस जी आय हॉस्पिटल पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने शिवाजीनगर गावठाण भागातील नागरिकांसाठी मंडळातर्फे मोफत नेत्र तपासणी शिबीर व मोफत चष्मे वाटप कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

या कार्यक्रमाचे उद्घाटन शिवाजीनगर भागातील कार्यक्षम नगरसेविका प्रा. ज्योत्स्ना गजानन एकबोटे  यांच्या हस्ते करण्यात आले. प्रा.ज्योत्स्ना एकबोटे यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले, त्यांनी सांगितले की असेच समाजोपयोगी उपक्रम सगळ्या गणेश मंडळांनी करायला हवेत आणि हा आदर्श घेऊन यातून प्रेरणा घ्यायला हवी . गणेशोत्सव मंडळानी समाज प्रबोधन कार्यक्रम करावेत असेही त्यांनी सांगितले.

सदर कार्यक्रमाचा एकूण 340 नागरिकांनी लाभ घेतला व २३२ लोकांना मोफत चष्मे वाटप करण्यात आले . सौ ज्योत्स्ना ताई एकबोटे यांचे मंडळाला नेहमीच मार्गदर्शन लाभत असते . ताईंच्या वतीने पुणे महानगरपालिकेच्या सार्वजनिक देणगी मधून मंडळाला एक लक्ष रुपयांची देणगी सुद्धा दिलेली आहे , तरीसुद्धा कुठेही गाजावाजा न करता ही सेवा त्यांनी श्री गणेश चरणी अर्पण केलेली आहे .
अशीच  समाजाची सेवा ताईंच्या हस्ते घडो असे सर्व नागरिकांचे म्हणणे होते.

याप्रसंगी मंडळाचे अध्यक्ष राहुल शिरोळे पाटील, अनिल बहिरट पाटील, विजय बहिरट पाटील, माणिक दुर्गे, नंदकिशोर शिरोळे पाटील, अविनाश तळेकर, संजय सिंग शिरोळे पाटील, अविनाश पाटील, केतन शिरोडकर, किशोर धुमाळ, प्रकाश आमराळे, मंडळाचे खजिनदार उमेश गोरे आणि कार्यकर्ते उपस्थित होते .
 

Leave a Reply

%d bloggers like this: