समस्त हिंदू आघाडीतर्फे मातृ-पितृ पूजन

पुणे, दि. १७ – सध्याची तरुणाई विविध डे, व्हॅलेंटाईन डे असे प्रेमाचे दिवस साजरी करते. याच तरुणाईचे आपल्या आई-वडिलांविषयी असलेले प्रेम अधिक दृढ व्हावे, याकरीता मातृ-पितृ पूजन कार्यक्रमाचे आयोजन समस्त हिंदू आघाडी व युवा सेवा संघातर्फे करण्यात आले.

लहानांपासून तरुण वर्ग आणि मोठयांनी देखील आपल्या आई-वडिलांचे पाय धुवून, चंदन, हळद-कुंकू लावून सात प्रदक्षिणा मारुन आरती करीत येरवडयात हा दिवस साजरा केला.
यावेळी समस्त हिंदू आघाडीचे प्रमुख मिलिंद एकबोटे, पुणे शहर रेशनिंग अधिकारी अस्मिता मोरे, रा.स्व.संघाचे अनिल भोसले, पुणे शहर शिवसेना प्रमुख संजय मोरे, शिवसेना पुणे कँंन्टोमेंटचे अध्यक्ष दिलीप तांबोळी, निमंत्रक संतोष गायकवाड आदी उपस्थित होते. 

संतोष गायकवाड म्हणाले, भारतात पाश्चात्य संस्कृती वाढत असून लहानांपासून तरुणाईपर्यंत अनेकांच्या विचारांमध्ये बदल झाले आहेत. आपल्या आई-वडिलांविषयी असलेली आत्मियता कमी होत चालली आहे. त्यामुळे मागील ११ वर्षांपासून आम्ही हा उपक्रम राबवित आहोत. याला उत्तम प्रतिसाद मिळत असून मोठया प्रमाणात नागरिक सहभागी होतात.

Leave a Reply

%d bloggers like this: