जॉन्सन पेडरने लाँच केली पूर्णपणे नवीन ‘मॅक्स सीरिज’

नवी दिल्ली – जॉन्सन पेडर या रोका ग्रुपच्या छताखालील ब्रॅण्डने आज आपल्या पूर्णपणे नवीन ‘मॅक्स सीरिज’ उत्पादन श्रेणीच्या लाँचिंगची घोषणा केली. ही श्रेणी कमाल टिकाऊ, दर्जेदार, परवड्याजोगे दरातील आणि १० वर्षांच्या वॉरंटीसह खात्रीशीर उत्पादने देऊ करत आहे. ‘मॅक्स सीरिज’मध्ये सॅनवेअर, फॉसेट्स, प्लास्टिक्स आणि वॉटर हीटर्स या सर्व बाथरूम कॅटेगरीजचा समावेश आहे. या नवीन उत्पादनश्रेणीच्या लाँचिंगच्या माध्यमातून जॉन्सन पेडरने सुरुवातीच्या (एण्ट्री-लेव्हल) विभागातील ग्राहकांपर्यंत पोहोचण्याचे लक्ष्य ठेवले आहे. या विभागातील ग्राहकांची इच्छा परवडण्याजोग्या दरात दर्जेदार बाथरूम उत्पादने खरेदी करण्याची असते.

सॅनवेअर श्रेणीखालील उत्पादनांमध्ये वॉल हंग बेसिसन्सचे तीन प्रकार आहेत – मॅक्स एक्सेल, मॅक्स स्पार्कल, मॅक्स ग्लीम आणि मॅक्स ग्लो. वॉटर क्लोसेट्सचे पाच प्रकार आहेत – मॅक्स स्पार्क वॉल हंग, मॅक्स आर्क सिंगल पीस, मॅक्स डॅझ कन्सील्ड युरोपीयन वॉटर क्लोसेट, मॅक्स युरोपीयन वॉटर क्लोसेट एक्स्पोज्ड आणि मॅक्स स्क्वॅटिंग पॅन.

‘मॅक्स फ्लो’ या फॉसेट कलेक्शनखाली कंपनीने १९ एसकेयूज लाँच केले आहेत. यात बेसिन मिक्सर्स, वॉल व सिंक मिक्सर्स, बिब टॅप्स व बाथ स्पाउट्सचा समावेश होतो. सर्व उत्पादने अव्वल दर्जाची व सुरळीत कार्यात्मकता असलेली आहेत. ही फॉसेट्स बाथरूममध्ये विशेष शोभून दिसतात आणि खात्रीशीर व टिकाऊही आहेत. याशिवाय फॉसेट्समध्ये गुळगुळीत फोम फ्लो तंत्रज्ञान आहे. सुरळीत कार्यात्मकता व दीर्घकाळ टिकण्यासाठी यात सिरॅमिक इनर हेड आहे. सध्याच्या परिस्थितीत वैयक्तिक स्वच्छतेचा मुद्दा लक्षात घेता, ब्रॅण्डने ‘मॅक्स हायजिन’ नावाचे वापरण्यास सोपे सेन्सर फॉसेट आणले आहे. यामध्ये डीसी आणि एसी-डीसी या दोहोंमध्ये ऑपरेट होणारा पिलर कॉक असतो.

जॉन्सन पेडरचे व्यवस्थापकीय संचालक  के. ई. रंगनाथन ‘मॅक्स सीरिज’च्या लाँचिंगबद्दल म्हणाले, ‘भारतातील सॅनिटरी वेअर बाजारपेठ उत्क्रांत होत असताना, जॉन्सन पेडर हा ब्रॅण्ड दर्जेदार उत्पादने परवडण्याजोग्या दरात खरेदी करून बाथरूमचे स्वरूप सुधारण्याची इच्छा असलेल्या ग्राहकांसाठी ‘स्मार्टर चॉइस’ देत आहे. आमची मॅक्स सीरिज ही ग्राहकांच्या गरजा लक्षात घेऊन डिझाइन करण्यात आली आहे आणि त्यांना आधुनिक, शैलीदार व अतिप्रगत बाथरूम फिटिंग्ज वापरण्यास प्रोत्साहन देणारी आहे. ‘मॅक्स’ हे नाव या कलेक्शनला विचारपूर्वक देण्यात आले आहे, कारण, टिकाऊपणा, परवडण्याजोगे दर व सर्वांत महत्त्वाचे म्हणजे दर्जा सगळेच या उत्पादनांमध्ये मॅक्स अर्थात कमाल आहे. कोविड साथीच्या आव्हानात्मक काळातही जॉन्सन पेडरने लक्षणीय वाढ साध्य केली आहे आणि ब्रॅण्ड उच्च दराने वाढत आहे.”

ब्रॅण्डने मॅक्स वॉटर हीटर्समधील नवीन प्रकार ६ ते २५ लिटर अशा चार विविध आकारमानांत आणले आहेत. यामध्ये इनबिल्ट-थर्मोस्टॅट, ऑटो थर्मल कटआउट, सेफ्टी व्हॉल्व्ह, फ्युजिंग प्लग, सिंगल वेल्ड टँक आणि ऊर्जा बचतीच्या दृष्टीने उच्च घनतेचे इन्सुलेशन आदी सुविधा आहेत. जॉन्सन पेडर उत्पादने सर्वोत्तम दर्जाच्या चाचण्यांमधून गेलेली असतात आणि उद्योगातील मानकीकृत मार्गदर्शक तत्त्वांखाली त्याचे उत्पादन केले जाते, जेणेकरून, ग्राहकांच्या वैविध्यपूर्ण गरजा ती उत्पादने पूर्ण करू शकतात.

Leave a Reply

%d bloggers like this: