fbpx
Monday, June 17, 2024
TECHNOLOGY

पॅनासोनिक कडून कनेक्‍टेड लिव्हिंग सोल्‍यूशन्‍स

नवी दिल्‍ली –  ग्राहकांचे रोजचे जीवन सुधारित करण्‍याची कटिबद्धता कायम राखत पॅनासोनिक इंडिया या वैविध्‍यपूर्ण तंत्रज्ञान कंपनीने आज त्‍यांचे आयओटी व एआय सक्षम कनेक्‍टेड लिव्हिंग व्‍यासपीठ मिराय च्‍या विस्‍तारीकरणाची घोषणा केली आणि व्‍यासपीठावर कनेक्‍टेड रेफ्रिजरेटर, वॉशिंग मशिन, वाय-फाय फॅन, रोमा स्‍मार्ट डिजिटल स्विचेस् आणि स्‍मार्ट वाय-फाय कंट्रोलर प्‍लग्‍स व स्विचेस् सादर केले. मिराय अप्‍लायन्‍सेसची नवीन रेंज पॅनासोनिक ब्रॅण्‍ड शॉप्‍स, मोठ्या आकाराचे रिटेल आऊटलेट्स व ऑनलाइन व्‍यासपीठांवर पुढील आठवड्यापासून उपलब्‍ध असेल. हे नवीन मॉडेल्‍स मिराय कनेक्‍टेड उत्‍पादनांच्‍या पहिल्‍या पिढीमधील भर आहेत. या पहिल्‍या पिढीमध्‍ये कनेक्‍टेड एअर कंडिशनर्स, स्‍मार्ट डोअर फोन्‍स, झिग्‍बी प्‍लग्‍स अॅण्‍ड स्विचेस् यांचा समावेश आहे, जे गेल्‍या वर्षी सादर करण्‍यात आले. ज्‍यामुळे एकाच व्‍यासपीठावर कनेक्‍टेड उत्‍पादनांची व्‍यापक रेंज उपलब्‍ध आहे.

कनेक्‍टेड उत्‍पादनांची नवीन रेंज ग्राहकांच्‍या विशिष्‍ट गरजा व पसंती जाणून घेतल्‍यानंतर काळजीपूर्वक विकसित करण्‍यात आली आहे. पॅनासोनिकने केलेल्‍या सिंडीकेटेड संशोधनानुसार*५६ टक्‍क्‍यांहून अधिक ग्राहकांची आयओटी सक्षम रेफ्रिजरेटर खरेदी करण्‍याची इच्‍छा आहे आणि ३९ टक्‍के ग्राहकांनी आयओटी सक्षम वॉशिंग मशिनमध्‍ये रूची दाखवली असून आरामदायी सुविधा, सोयीसुविधा व सुरक्षितता या बाबींना सर्वाधिक मागणी देण्‍यात आली. तसेच आयएफएमए (इंडियन फॅन मॅन्युफॅक्चरिंग असोसिएशन)नुसार,४३टक्के ग्राहकवापरण्याची सुलभता व कनेक्टिव्हीटीच्या लाभाची‌ मूल्यात्मक भर यांमुळे आयओटी सक्षम स्मार्ट फॅन्सवापरण्यास इच्छुक आहेत.सुरू असलेल्‍या महामारीमुळे ग्राहक घरामध्‍येच आहेत, ज्‍यामुळे तंत्रज्ञान-सक्षम सोल्‍यूशन्‍ससाठी मागणीमध्‍ये वाढ झाली असून स्‍मार्ट व कनेक्‍टेड होम अप्‍लायन्‍सेससाठी देखील मागणीमध्‍ये वाढ झाली आहे.

सादरीकरणाप्रसंगी बोलताना पॅनासोनिक इंडिया व साऊथ एशियाचे अध्‍यक्ष व मुख्‍य कार्यकारी अधिकारी मनिष शर्मा म्‍हणाले,”महामारीमुळे ग्राहकोपयोगी वस्‍तूंच्‍या उद्योगक्षेत्रामध्‍ये प्रचंड तंत्रज्ञान क्रांती घडून येत आहे, ज्‍यामुळे आयओटी सक्षम अप्‍लायन्‍सेसच्‍या अवलंबतेला चालना मिळाली आहे. ‘घरहै नवीन हब’ ही संकल्‍पना कायमस्‍वरूपी राहण्‍याची शक्‍यता आहे, ज्‍यामुळे ग्राहक आरामदायी सुविधा व सुरक्षिततेच्‍या खात्रीसाठी त्‍यांचे लिव्हिंग स्‍पेसेस् अद्ययावत करत आहेत. मिरायचे विस्‍तारीकरण आमच्‍या ग्राहकांच्‍या सर्वसमावेशक महत्त्वाकांक्षांशी संलग्‍न असलेल्‍या स्‍मार्ट क्षमता देण्‍याच्‍या आमच्‍या कटिबद्धतेला दाखवते. आम्‍ही मिरायसह तंत्रज्ञानाचे लोकशाहीकरण करण्‍यास उत्‍सुक आहोत. तसेच आमचा मालकीहक्‍काचा एकूण खर्च कमी करण्‍याचा मनसुबा आहे. व्‍यासपीठ युजर्सना आवश्‍यक सर्विसिंगसाठी नियमितपणे नोटिफिकेशन्‍स पाठवते, ज्‍यामधून काळानुरूप अधिकतम आऊटपुट व कार्यक्षम कामगिरीला चालना मिळते.”

श्री. शर्मा पुढे म्‍हणाले,”भारताच्‍या खऱ्याउत्‍साहाला सादर करत मिराय ऑफरिंग्‍ज आम्‍हाला माननीय पंतप्रधान यांच्‍या ‘आत्‍मनिर्भर भारत’च्‍या दृष्टिकोनाजवळ घेऊन जातात. आमचे उत्‍पादन विस्‍तारीकरणावर, तसेच आमच्‍या नाविन्‍यपूर्ण व स्थिर सोल्‍यूशन्‍स धोरणाद्वारे मार्गदर्शन घेत भारतातील इलेक्‍ट्रॉनिक्‍स निर्मितीसाठी क्षमता निर्माण करण्‍यावर लक्ष केंद्रित आहे.”

पॅनासोनिक लाइफ सोल्‍यूशन्‍स इंडियाचे संयुक्‍त व्‍यवस्‍थापकीय संचलाक श्री. दिनेश अगरवाल म्‍हणाले,”वर्क फ्रॉम होमचे न्‍यू नॉर्मल आणि महामारीमुळे स्‍मार्ट व कनेक्‍टेड अप्‍लायन्‍सेसच्‍या मागणीमध्‍ये वाढ होताना दिसत आहे. आम्‍ही असे विश्‍व पाहत आहोत, जेथे सर्व डिवाईसेस, अप्‍लायन्‍सेस व गॅझेट्स आयओटी सक्षम, अॅप व वॉईस-नियंत्रित असतील. गुगल व अॅमेझॉन विविध भारतीय भाषांमध्‍ये वॉईस इंजिन्‍स विकसित करत असताना आम्‍हाला विश्‍वास आहे की मिराय डिवाईसेस व अप्‍लायन्‍सेसच्‍या अवलंबतेला चालना मिळेल. आम्‍हाला व्‍यावसायिक व निवासी प्रकल्‍पांमध्‍ये मिराय अप्‍लायन्‍सेस व डिवाईसच्‍या आमच्‍या पहिल्‍या पिढीच्‍या सादरीकरणाला यश मिळाल्‍याचे दिसण्‍यात आले आहे. सरकारच्‍या ‘आत्‍मनिर्भर भारत’ दृष्टिकोनाशी बांधील राहत आमची स्‍थानिक पातळीवर डिझाइन व उत्‍पादित करण्‍यात आलेल्‍या आयओटी स्‍मार्ट उत्‍पादनांची नवीन रेंज – फॅन्‍स, रोमा स्‍मार्ट डिजिटल स्विचेस् आणि वायफाय कंट्रोल्‍ड प्‍लग्‍स अॅण्‍ड स्विचेससह आम्‍ही स्‍मार्ट होम व ऑफिससाठी किफायतशीर कनेक्‍टेड लिव्हिंग सोल्‍यूशन्‍सची परिपूर्ण रेंज देण्‍यामध्‍ये अग्रस्‍थानी आहोत.”

श्री. अगरवाल पुढे म्‍हणाले,”आम्‍ही डिवाईसेस व अप्‍लायन्‍सेस सादर करणे सुरूच ठेवू, ज्‍यामुळे आम्‍ही ऊर्जा बचत, आरामदायी सुविधा व सुरक्षिततेचा मनुसबा कायम राखत ग्राहकांच्‍या सर्व गरजांची पूर्तता करण्‍यामध्‍ये यशस्‍वी होऊ. आम्‍ही लवकरच आरोग्‍य, आदरातिथ्‍य, रिटेल व औद्योगिक विभागांमध्‍ये देखील हे डिवाईसेस विस्‍तारित करणार आहोत.”

आरोग्‍य व सुरक्षिततेबाबत समस्‍यांचे निराकरण करत आणि ग्राहकांसाठी आरामदायी सुविधांमध्‍ये भर करत पॅनासोनिकच्‍या आयओटी-सक्षम अप्‍लायन्‍सेसच्‍या नवीन रेंजमध्‍ये अनेक प्रगत वैशिष्‍ट्ये येतात, जसे वॉशिंग मशिनमध्‍ये आवडीनुसार सानुकूल वॉश प्रोग्राम्‍स सेट करण्‍यासाठी वातावरणीय स्थितींनुसार वॉश सायकलचे नोटिफिकेशन अलर्ट्स,रेफ्रिजरेटर डोअर, फ्रिजर डोअर, पुरेसे तापमान व वीजपुरवठ्याबाबत माहिती मिळण्‍यासाठी रेफ्रिजरेटर्समध्‍ये डायग्‍नोसिस मोड,सर्व खोलींमधील स्विचेसच्‍या व्‍यवस्‍थापनासाठी स्‍मार्ट वाय-फाय कंट्रोलरच्‍या माध्‍यमातून विद्यमान स्विचेसना वाय-फाय सक्षम बनवणे.ग्राहक मिराय अॅपच्‍या माध्‍यमातून एका बोटाच्‍या क्लिकसह कुठूनही त्‍यांचे अप्‍लायन्‍सेस कार्यसंचालित करू शकतात. मिराय व्‍यासपीठ ई-वॉरण्‍टीजचे व्‍यवस्‍थापन आणि सर्विस रिक्‍वेस्‍ट्सबाबत नोटिफिकेशन्‍स देत सुलभ वापर देते, तसेच ते अधिक सुलभ कार्यसंचालनांसाठी अॅमेझॉन अलेक्‍सा व गुगल असिस्‍टण्‍ट सारख्‍या वॉईस असिस्‍टण्‍ट्सच्‍या माध्‍यमातून देखील कार्यसंचालित करता येऊ शकते.

पॅनासोनिकच्‍या इंडिया इनोव्‍हेशन सेंटरने मिरायची स्‍वदेशी संकल्‍पना, डिझाइन व उत्‍पादन केले आहे. मिराय भारतामध्‍ये सर्वोत्तम उत्‍पादन निर्माण करण्‍याप्रती कटिबद्ध आहे. स्‍वदेशी मिराय अॅप्‍लीकेशन आता स्‍मार्ट अँड्रॉईड टीव्‍हीसाठी देखील सादर करण्‍यात आले आहे. हे अॅप्‍लीकेशन हिंदी, तमिळ भाषांमध्‍ये उपलब्‍ध आहे आणि लवकरच तेलुगु, मराठी व बंगाली भाषांमध्‍ये उपलब्‍ध असणार आहे. ज्‍यामुळे कनेक्‍टेड लिव्हिंग अवलंबता सर्वसमावेशक होण्‍यासोबत ग्राहक अनुभव सक्षम होईल. मिराय व्‍यासपीठाला अॅनालॉजी डिझाइनसह ब्रॅण्‍ड अॅण्‍ड कम्‍युनिकेशन डिझाइनसाठी प्रतिष्ठित रेड डॉट अवॉर्ड देखील मिळाला.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading