हंगामा म्युझिकचा ओरीजनल पॉडकास्ट’मध्ये प्रवेश

हंगामा म्युझिक, ही देशातील अग्रगण्य म्युझिक स्ट्रिमिंग सर्विसेसपैकी एक मानली जाते. आज त्यांच्या वतीने अस्सल पॉडकास्ट निर्मिती आणि वितरणात प्रवेशाची घोषणा करण्यात आली. या मंचावर 6 भाषांमध्ये 30 हून अधिक नवीन पॉडकास्ट लॉन्च करण्याची योजना आखण्याचे निश्चित करण्यात आले. त्यामध्ये सेलेब्रिटी मुलाखती, संगीत, फॅशन, लाइफस्टाइल, मनोरंजनपर बातम्या आणि तत्सम बऱ्याच प्रकारांचा समावेश राहील. या मंचावर भारतीय तसेच आंतरराष्ट्रीय कंटेंट निर्मितीदारांसमवेत काम करणार असून वैश्विक प्रेक्षकांकरिता सर्वोत्तम पॉडकास्टची निर्मिती करण्यात येणार आहे. या मंचावर बहुभाषी मजकूर उपलब्ध होणार असून हंगामा म्युझिकचे पॉडकास्ट हिंदी, तामिळ, तेलुगु, मराठी, बंगाली आणि इंग्रजी अशा 6 भाषांमध्ये तयार होणार आहे.  

हंगामा म्युझिकवरील आगामी पॉडकास्टमध्ये ओरीजनल ऑडीओ शोचा समावेश असेल, यामध्ये लोकप्रिय सेलेब्रिटी नाट्य, विनोद, भय अशा विविध प्रकारच्या कथांमधून मुख्य भूमिका साकारतील. या माध्यमातून वापरकर्त्याना गुंतवून टाकणाऱ्या कथाकथनाचा अनुभव मिळेल. या मंचावर त्यांना निवेदनाची संधीही असेल. ध्वनी प्रकारचे अभिनव अंग या निमित्ताने अनुभवता येणार आहे. ऐकणाऱ्या रसिकांना संवादात्मक कार्यक्रमाचा आनंदही घेता येईल. यामध्ये सेलेब्रिटी, वादक-कलाकार आणि अन्य प्रसिद्ध व्यक्तींचा लाईव्ह सहभाग राहील. त्याचप्रमाणे या पॉडकास्टमध्ये मनोरंजन आणि फॅशनच्या क्षेत्रातील ताज्या विषयांची चर्चा रंगणार आहे. याशिवाय, हंगामा म्युझिकवर कविता, लघुकथा आणि स्टँड-अप कॉमेडीसंबंधी पॉडकास्टचा आनंद घेता येणार आहे.

या पॉडकास्टविषयी बोलताना हंगामा डिजीटल मीडियाचे सीओओ सिद्धार्थ रॉय म्हणाले की, “वापरकर्त्यांकडून ऑडीयो कंटेंटला मागणी वाढत असून ऑनलाईन म्युझिक स्ट्रिमिंगचा अनुभव वृद्धिंगत होऊन तो वैशिष्ट्यपूर्ण ठरतो आहे. आमचे पॉडकास्ट सामान्य नाहीत, ते ग्राहकाला परस्परसंवादी ऑडीयो कंटेंट उपलब्ध करून देतात. तंत्रज्ञानाचा जास्तीत-जास्त वापर करून ग्राहकाला गुंतवून ठेवण्याकडे आमचा कल आहे. जेणेकरून आमच्या मंचावर त्याला दर्जेदार साहित्याची गोडी अनुभवता येईल. आम्ही झपाट्याने आमची पॉडकास्ट लायब्ररी विस्तारण्यावर भर देत आहोत. वर्षाच्या शेवटी ओरीजनल ऑडीयो प्रोग्रामिंगचे 1000 हून अधिक तास उपलब्ध करून देण्याचे आमचे उद्दिष्ट आहे.”

हंगामा म्युझिकने हबहॉप्पर समवेत भागीदारी केली असून, या माध्यमातून या मंचावर पॉडकास्टची लायब्ररी उपलब्ध होईल. या मंचावर धर्म आणि अध्यात्म, विनोद, कथाकथन, भय, थरार, अस्सल गुन्हेगारी, बातमी आणि राजकारण, मनोरंजन, क्रिकेट आणि क्रीडा, आरोग्य आणि तंदुरुस्ती इ. विषय वर्गवारी 15 भाषांमधून उपलब्ध होणार आहे. काही पॉडकास्टमध्ये स्टोरी टाईम वुईथ सोहा आली खान, मालिनीज वर्ल्ड बाय मिस मालिनी, म्युझिंग्ज बाय सुता,  मिलेनियल मनी मॅटर्स, द क्रिकेटन्यूज. कॉम पॉडकास्ट, पॉपकास्ट वुईथ गरीमा इत्यादींचा समावेश आहे. सर्व पॉडकास्ट <https://www.hungama.com/podcasts.> वर उपलब्ध आहेत.

Leave a Reply

%d bloggers like this: