वारकरी महामंडळाचा नियुक्तीपत्र प्रदान सोहळा संपन्न

 रामदास महाराज मनसुख यांच्या चरित्रग्रंथाचे प्रकाशन 

पिंपरी – समाजाला योग्य दिशा देण्याचे सामर्थ्य वारकरी पंथामध्ये आहे. वारकरी पंथाचा समाजाच्या तळागाळात विचार होऊन या पंथाच्या विचाराची जोपासना व्हायला हवी, असे प्रतिपादन महामंडलेश्वर डॉ. रामकृष्णदास लहवितकर यांनी केले.

महाराष्ट्र वारकरी महामंडळाच्या वतीने पिंपळे गुरव येथील निळु फुले नाट्यगृहात आयोजित पदाधिकारी नियुक्ती प्रदान सोहळ्यात डॉ. लहवितकर बोलत होते. पिंपरी चिंचवड महापालिकेचे महापौर माई ढोरे, पुणे महापालिकेचे महापौर मुरलीधर मोहोळ, आमदार लक्ष्मण जगताप, रामेश्वर महाराज शास्त्री यांच्या हस्ते पुणे जिल्हा, पुणे शहर, पिंपरी चिंचवड शहर पदाधिकारी नियुक्ती प्रदान सोहळा पार पडला. यावेळी वैकुंठवासी संतवीर ह.भ.प. रामदास महाराज मनसुख यांच्या चरित्र ग्रंथाचे प्रकाशन करण्यात आले.

यावेळी संत तुकाराम महाराज संस्थानचे अध्यक्ष ह. भ. प. मधुकर मोरे, अतिरिक्त आयुक्त अजित पवार, भंडारा डोंगर दशमी समितीचे अध्यक्ष बाळासाहेब काशीद, मोरया गोसावी देवस्थानचे मुख्य  विश्वस्त मंदार देव, माजी आमदार दिगंबर भेगडे,  लोणावळा मनशक्ती केंद्राचे मुख्य विश्वस्त प्रमोदभाई शिंदे, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष संजोग वाघेरे, महाराष्ट्र वारकरी महामंडळाचे अध्यक्ष कृष्णाजी रांजणे,  विभागीय अध्यक्ष जीवन खानेकर, पुणे जिल्हा अध्यक्ष सतिश महाराज काळजे, पिंपरी चिंचवड शहराध्यक्ष विजय जगताप, पुणे शहराध्यक्ष चंद्रकांत महाराज वांजळे, पुणे जिल्हा युवकाध्यक्ष संतोष महाराज पायगुडे, प्रसिद्धी प्रमुख संजय भिसे, किशोर पाटील, नगरसेवक अंबरनाथ कांबळे, माजी नगरसेवक राजेंद्र जगताप, नगरसेविका माधवी राजापुरे आदी उपस्थित होते. 

दरम्यान, महापौर ढोरे, महापौर मोहोळ, रामेश्वर महाराज शास्त्री यांनीही मनोगत व्यत केले. चंद्रकांत वांजळे यांनी प्रास्ताविक केले. जालिंदर काळोखे व संतोष पायगुडे यांनी सूत्रसंचालन, तर सतिश काळजे यांनी आभार मानले.

Leave a Reply

%d bloggers like this: