बीडीपी जागांवरील अनधिकृत बांधकामे सुरूच  : अधिकाऱ्यांवर कारवाई न केल्यास साखळी उपोषणाचा इशारा

पुणे, दि. ९ – महानगरपालिकेच्या हद्दीतील जैव वैविध्य उद्यानांच्यासाठी राखीव जागांवर (बीडीपी ) मोठ्या प्रमाणावर अनधिकृत बांधकामे चालू आहेत ,त्याकडे पालिकेचे अधिकारी जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत असून अनधिकृत बांधकामांवर, आणि या बांधकामांना जबाबदार अधिकाऱ्यांवर तातडीने कारवाई करण्याची मागणी ‘ऑल इंडिया अँटी करप्शन बोर्ड ‘ने  पालिका आयुक्तांकडे  निवेदनाद्वारे केली आहे. 

‘ऑल इंडिया अँटी करप्शन बोर्ड’चे प्रदेशाध्यक्ष सनी लक्ष्मण निम्हण यांनी मंगळवारी हे निवेदन पालिका आयुक्त कार्यालयात दिले. अधिकाऱ्यांवर कारवाई न केल्यास साखळी उपोषणाचा इशारा या निवेदनात देण्यात आला आहे. सिंहगड कॉलेज परिसरात रहिवाशी क्षेत्रात कारवाई  करताना मंगळवारी पिण्याच्या पाण्याची वाहिनी तुटली गेल्याचा निषेध या निवेदनात करण्यात आला आहे. अनधिकृत बांधकामावर कारवाई च्या नावाखाली संबंधित बांधकामाच्या गच्चीवर होल पाडून पालिकेचे अधिकारी  निघून जात आहेत. नगरसेवक, लोक प्रतिनिधींचा  राजकीय दबावही येत आहे . 

पुण्यात नगरसेवक,लोकप्रतिनिधी देखील बीडीपी राखीव जागांवर प्लॉटिंग आणि अनधिकृत बांधकामे करीत आहेत. सिंहगड आणि वारजे भागात हे प्रमाण सर्वाधिक आहे. हिंगणे, तुकाई नगर वडगाव, आंबेगाव, समर्थ नगर, टिळक नगर या सिंहगड रस्ता परिसरात तसेच बावधन,भूगाव मध्ये अनधिकृत  बांधकामातुन बीडीपी चे आरक्षण गिळंकृत केले जात आहे,ही गंभीर बाब आहे असे या निवेदनात म्हटले आहे. 

महापालिकेच्या बांधकाम विभागाला सांगून, पाठपुरावा  कारवाई होत नसल्याने बांधकामे वाढून शहराचे विद्रुपीकरण होत आहे. बीडीपी प्रकरणी तातडीने कारवाई करावी, अशी मागणी या निवेदनाद्वारे सनी लक्ष्मण निम्हण यांनी केली आहे.

Leave a Reply

%d bloggers like this: