Saturday, May 30, 2026
PUNE

जेएससी एज्युकेशनल ट्रस्टतर्फे पुण्यात फॉरेन लँग्वेज स्टुडिओ, लाईफ स्कील प्रशिक्षण

पुणे, दि. ९ – जेएससी एज्युकेशनल ट्रस्टतर्फे पुण्यात फॉरेन लँग्वेज स्टुडिओ, लाईफ स्कील प्रशिक्षण सुरू करण्यात येत आहे.ट्रस्टच्या संस्थापक डॉ. स्नेहा जोगळेकर यांनी पत्रकाद्वारे ही माहिती दिली.

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते अनिल शिदोरे,प्रदेश सरचिटणीस अॅड.किशोर शिंदे,महाराष्ट्र नवनिर्माण कामगार सेनेचे उपाध्यक्ष राजेश उज्जैनकर यांच्या हस्ते प्रारंभ होणार आहे. यावेळी डॉ. स्नेहा जोगळेकर लिखित ‘द बस आय मिस्ड’ या पुस्तकाचे प्रकाशन, ट्रस्टच्या संकेतस्थळाचा प्रारंभ होणार आहे. १४ फेब्रुवारी रोजी सकाळी ११ वाजता वनाझ कॉर्नर जवळील ट्रस्टच्या कार्यालयात हा कार्यक्रम होणार आहे.

ट्रस्टचे विश्वस्त वर्षा पराडकर,वरुण जोगळेकर,निष्का जोगळेकर,ओम कुंभार, अतुल पराडकर यावेळी उपस्थित राहणार आहेत

स्पोकन जर्मन, जपानी, चिनी या परकीय भाषा शिकवल्या जाणार आहेत. स्पोकन इंग्लीश, संस्कृत भाषा देखील  शिकवल्या जाणार आहेत.व्यवसायाभिमुख अभ्यासक्रम शिकवले जाणार आहेत. परदेशात शिक्षणासाठी जाताना द्याव्या लागणाऱ्या परीक्षा तसेच रोजगारसंधीची माहिती दिली जाणार आहे.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading