शेतकऱ्यांच्या देशव्यापी चक्काजाम आंदोलनाला संभाजी ब्रिगेडचा जाहीर पाठिंबा
पुणे, दि. ५ – केंद्र सरकारने देशातील शेतकरी व कामगारांच्या विरोधात शेतकरी विरोधी तीन कायदे केले. पंजाब व हरियाणा यांच्या सह देशातील सर्व शेतकरी संघटना केंद्र सरकारच्या विरोधात दिल्ली मध्ये ७२ दिवसांपासून आंदोलन करत आहेत. संभाजी ब्रिगेडच्या वतीने सुद्धा या आंदोलनास जाहीर पाठिंबा देऊन प्रत्यक्ष सहभाग घेतला आहे. उद्याच्या शेतकऱ्यांच्या देशव्यापी चक्काजाम आंदोलनाला संभाजी ब्रिगेडचा जाहीर पाठिंबा असल्याची माहिती प्रदेशाध्यक्ष अॕड. मनोज आखरे आणि प्रदेश संघटक संतोष शिंदे यांनी दिली.
महाराष्ट्रात संभाजी ब्रिगेड’चे प्रदेशाध्यक्ष अॕड. मनोज आखरे यांच्या नेतृत्वाखाली दि. ०७/१२/२०२० रोजी महाराष्ट्राच्या प्रत्येक जिल्ह्यात व तालुका स्तरावर शेतकऱ्याच्या सन्मानार्थ निवेदन देत केंद्र सरकारच्या विरोधात ‘धरणे आंदोलन’ करण्यात आले.तसेच, दि. ०८ डिसेंबर २०२० रोजी संपुर्ण भारत बंदला पाठिंबा देत त्यामध्ये प्रत्यक्ष सहभाग नोंदविला. आम्ही शेतकरी व कामगारांच्या हितासाठी सदैव त्यांच्या सोबत आहोत.
केंद्र सरकारने शेतकऱ्यांसाठी केलेल्या कायदा हा शेतकरी विरोधात आहे म्हणून लाखोंच्या संख्येने शेतकरी रस्त्यावर उतरून या काळ्या कायद्याविरोधात आंदोलन करत आहेत.मात्र सरकार हुकूमशाही पद्धतीने शेतकऱ्यांचे आंदोलन चिरडून टाकण्याचा प्रयत्न करत आहे. शेतकरी या कायद्याच्या विरोधात असतील तर केंद्र सरकार अर्थात देशाचे पंतप्रधान मा. नरेंद्र मोदी यांनी या शेतकऱी विरोधी कायद्यावर तात्काळ विचार करून व शेतकऱ्यांचे आंदोलन लक्षात घेऊन तात्काळ कायदा रद्द करावा… अशी संभाजी ब्रिगेड ची भूमिका आहे.
देशात सध्या शेतकऱ्यांपेक्षा कोणीही मोठा नाही, अशी आमची भुमिका आहे. शेतकऱ्यांना सन्मानात… संभाजी ब्रिगेड कायम मैदानात आहे हे ध्यानी ठेवावे. म्हणून संभाजी ब्रिगेडची मागणी आहे कि शेतकरी विरोधी काळा कायदा तात्काळ रद्द करा… ऊध्याच्या दि.०६ फेब्रुवारी २०२१ च्या शेतकऱ्यांच्या देशव्यापी चक्काजाम आंदोलनास संभाजी ब्रिगेडचा जाहिर पाठिंबा आहे.