काळी मिरी लागवडीसाठी ‘कोकण बिझनेस फोरम’ चा अभ्यासदौरा
पुणे : कोकणात शास्त्रीय पद्धतीने काळी मिरीची लागवड वाढावी या उद्देशाने ‘कोकण बिझनेस फोरम’ने अभ्यासदौऱ्याचे आयोजन केले आहे. फोरम चे संस्थापक संजय यादवराव यांनी पत्रकाद्वारे ही माहिती दिली. हा अभ्यासदौरा रविवार,७ फेब्रुवारी रोजी बांदिवडे(पालयेवाडी) ता.मालवण,जि.सिंधूदुर्ग येथे आयोजित करण्यात आला आहे.
जगभर विशेषत: अमेरिका आणि युरोप येथे मागणी असते असे काळी मिरी हे भविष्यातील कोकणातील महत्त्वपूर्ण ग्लोबल कृषी उत्पादन असणार आहे.’काळीमिरी लागवड’ या विषयाची संपूर्ण माहिती या अभ्यास दौऱ्यामध्ये काळीमिरी शेतीतील यशस्वी शेतकरी मिलिंद प्रभू व कृषी तज्ञ डॉक्टर जे.एल. पाटील हे देतील.
मु.पो.बांदिवडे (ता.मालवण, जि.सिंधुदूर्ग)येथे काळीमिरी प्रत्यक्ष लागवड पहाणी व काढणी पश्चात तंत्रज्ञानाचे प्रात्यक्षिक तसेच शंकांचे निरसन असा संपूर्ण एकदिवसीय अभ्यास दौरा कोकण बिझनेस फोरम च्या माध्यमातून आयोजित केला आहे.ज्यांना या प्रत्यक्ष अभ्यास दौरा मध्ये सहभागी व्हायचे असेल त्यांनी नोंदणीसाठी ८८५०८०७२२७, ९०८२७८१५५१ क्रमांकांवर संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.