संगणकीय डिव्हाईसेसच्या अतिवापराने होणाऱ्या दुष्परिणामांवर मार्गदर्शन आणि उपचार

पुणे, दि. ५- विश्वानंद केंद्र सेंटर फॉर इंटिग्रेटिव्ह मेडिसिन आणि केरळ आयुर्वेद लिमिटेड यांच्या संयुक्त विद्यमाने संगणकीय डिव्हाइसेसचा सतत वापर केला गेल्यामुळे होणाºया आजारांसाठी व आजार होऊ नयेत  यासाठी काय काळजी घ्यावी यासाठी उपचार आणि तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. शनिवार दिनांक ६ फेब्रुवारी रोजी सकाळी १० वाजता शिबिराचे उद्घाटन होणार आहे, 

संगणक उद्योजक बन्सी मेहता यांच्या हस्ते शिबिराचे उद्घाटन होणार आहे. मान, पाठ, हात, या मस्कयुलर स्केलेटल स्नायू व सांध्यांच्या दुखण्यासाठी विशेष मार्गदर्शन शिबिरात मिळणार आहे.  त्यासाठी आयुर्वेद उपचार तज्ञ यांचे मार्गदर्शन तसेच फिजिओथेरपी डॉक्टर मार्फत व्यायामासंबंधी मार्गदर्शन केले गेले जाणार आहे. यावेळी रुग्णाना मोफत मार्गदर्शन, व्यायाम  आणि औषधे दिली जाणार आहेत. केरळ आयुर्वेद लिमिटेड या कंपनीतर्फे मोफत औषधांचे वाटप केले जाणार आहे. सकाळी १० ते २ यावेळेत शिबिराचा लाभ घेता येणार आहे.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शिबिरासाठी नावनोंदणी आवश्यक आहे. यासाठी विश्वानंद केंद्र १०१  प्रमोद विहार, वाळवेकर नगर, पुणे-सातारा रोड येथे किंवा ०२०२४२२२९०० या क्रमांकवर संपर्क साधून नाव नोंदविता येईल.

Leave a Reply

%d bloggers like this: