राजमाता जिजाऊचा आदर्श आजच्या तरुण पिढीने घेऊन आपले जीवन यशस्वी करावे – प्रा. डॉ. निवेदिता एकबोटे

जिजामाता जयंती निमित्त मातृगौरव पुरस्कारांनी आदर्श मातांचा सत्कार

पुणे – मातृशक्ती च्या वतीने लाल महाल येथे राजमाता जिजामाता जयंती साजरी करण्यात आली. त्यावेळी उपमहापौर सरस्वती शेंडगे समस्त हिंदू आघाडीचे कार्याध्यक्ष मिलिंद एकबोटे ,मानव मिलन संस्थेच्या मंजू चोपडा,भारतीय जनता युवा मोर्चा युवती अध्यक्षा प्रा.डॉ.निवेदिता गजानन एकबोटे मान्यवर उपस्थित होते.
या कार्यक्रमामध्ये हुतात्मा सैनिक संग्राम पाटील (कोल्हापूर) यांच्या मातोश्री सावित्री शिवाजी पाटील या वीर मातेला याप्रसंगी सन्मानचिन्ह आणि रोख निधी देऊन सन्मानित करण्यात आले. त्याचप्रमाणे ज्योती नारायण रासने, अरुंधती रवींद्र शहा, अनघा सुहास बिनीवाले, नंदा अरुण डांगे, शकुंतला सोपान पवार यांना ‘आदर्श माता’ म्हणून उपमहापौर सरस्वती शेंडगे यांनी सन्मानित केले.

आयुष्यभर प्रचंड कष्ट करून आपल्या कुटुंबाचा उत्कर्ष साधण्याचे काम या आदर्श मातांनी केले आहे यापैकी डांगे यापूर्वी सफाई कर्मचारी म्हणून काम करत होत्या आणि सौ पवार या मोलकरणीचे काम करत होत्या मंजू चोपडा यांनी जिजामाताना आदरांजली वाहताना जिजामातेचे हिंदूसमाजावर मोठे उपकार आहेत असे सांगितले. डॉ. निवेदिता एकबोटे यांनी आपल्या प्रभावी भाषणात ‘एक स्त्री’ आपल्या आयुष्यात केवढे मोठे काम करू शकते याचा आदर्श जिजामाता यांच्या जीवनचरित्रात दिसून येतो. जिजामाते कडून प्रेरणा घेऊन समस्त हिंदूंनी देव,देश आणि धर्म यांच्यावर होणाऱ्या आघातांना प्रत्युत्तर दिले पाहिजे आणि देशद्रोही प्रवृत्तीचांनाश केला पाहिजे.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रीती शिंदे यांनी केले तर हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सौ.सारिका वारुळे, आशा नलावडे, अनुराधा घोरपडे, चारुलता काळे, मनीषा गोरे, सुनंदा कोंढरे, मनीषा जाधव यांनी परिश्रम घेतले.

Leave a Reply

%d bloggers like this: