भारतरत्न पं. भीमसेन जोशी यांच्या जन्मशताब्दीला सुरुवात

पुणे – भारतरत्न पं. भीमसेन जोशी यांच्या जन्मशताब्दीला आज गुरुवार दि. ४ फेब्रुवारी, २०२१ पासून सुरुवात झाली. शिवाजीनगर येथील सवाई स्मारकात आर्य संगीत प्रसारक मंडळाच्या वतीने आज पं. भीमसेन जोशी यांनी आदरांजली वाहण्यात आली. आर्य संगीत प्रसारक मंडळाचे विश्वस्त श्रीनिवास जोशी, शिल्पा जोशी, शुभदा मुळगुंद, पं. उपेंद्र भट, आनंद भाटे, मुकुंद संगोराम, प्रभाकर देशपांडे, मिलिंद देशपांडे, पंडितजींचा नातू विराज जोशी आदी मान्यवर उपस्थित होते. या वेळी पं. भीमसेन जोशी यांच्या तसबीराला पुष्पहार अर्पण करीत दीपप्रज्वलन करण्यात आले. यानंतर  शिष्यांना राग तोडी सादर करीत पं. भीमसेन जोशी यांना अभिवादन केले.

Leave a Reply

%d bloggers like this: