fbpx
Friday, April 26, 2024
ENTERTAINMENTLIFESTYLE

थंडीला दूर पळवण्यासाठी भूमी वापरते साधे देशी उपाय

हिवाळा आता चांगलाच जाणवू लागला आहे आणि लोकप्रिय बॉलिवूड सेलेब्रिटी भूमी पेडणेकर सांगत आहे काही घरगुती उपाय; हिवाळ्यात सर्दी-खोकला बरा करण्यासाठी व्हिक्स व्हेपोरब घातलेल्या पाण्याची वाफ, हळद घातलेले दूध आणि व्यायाम हे उपाय भूमी या हिवाळ्यात करत आहे.

आघाडीची अभिनेत्री भूमी पेडणेकर शाकाहारी झाल्याची करून अलीकडेच सर्वांचे लक्ष वेधून घेतले. भूमीने फिटनेससाठी अत्यंत काटेकोर दिनक्रम आखून तिच्या चाहत्यांची मने तर जिंकून घेतलीच आहेत, शिवाय, तिच्या सहकाऱ्यांनाही याची दखल घेण्यास भाग पाडले आहे.

भूमीने हिवाळ्यात ती स्वत:ची काळजी कशी घेते हे सांगणारा काहीसा घरगुती मेसेज नुकताच सोशल मीडियावर पोस्ट केला. आरोग्यपूर्ण आहार आणि वर्कआउट या दिनक्रमाबद्दल आग्रही असलेली भूमी तिच्या फॉलोअर्सना फिट राहण्यासाठी व आरोग्यपूर्ण जीवन जगण्यासाठी कायमच प्रेरणा देते. हिवाळ्यात रोगप्रतिकारक्षमता व शक्ती वाढवण्यासाठी योग्य भाज्या निवडण्यापासून ते श्वसनाचे आरोग्य कायम राखण्यासाठी पारंपरिक उपायांपर्यंत खूप काही भूमी सध्या हिवाळ्यात स्वत:ची काळजी घेण्यासाठी  करत आहे. घसरत चाललेला तापमानाचा पारा आणि त्यात शूटिंगची घाईगर्दी यामुळे सर्दी किंवा खोकला होण्याची शक्यता किती वाढली आहे हे भूमी इन्स्टाग्रामवर पोस्ट केलेल्या मेसेजमध्ये सांगते. म्हणूनच या काळात आरोग्यपूर्ण जीवनशैलीसाठी ती काळजी घेते. कोमट पाणी पिणे, नियमितपणे वाफ घेणे, दररोज व्यायाम करणे आणि अर्थातच घरी शिजवलेले पोषक जेवण यांसारख्या साध्या पण डॉक्टरांनी संमती दिलेल्या युक्त्या करून आपण सर्दी व खोकला बरा करू शकतो असे तिने म्हटले आहे.

याबद्दल भूमी पेडणेकर लिहिते, “स्वत:ची काळजी घेण्याबद्दल बोलायचे तर आरोग्याला माझे सर्वोच्च प्राधान्य असते. कडक हिवाळ्याच्या दिवसांत आपण आपल्या आरोग्याची व स्वास्थ्याची काळजी घेतली नाही, तर आपल्याला खूपच सुस्ती येते असे मला वाटते. एखादा दिवस तुम्हाला खूप छान वाटते, दुसऱ्या दिवशी सर्दीने नाक चोंदलेले असते. माझे नुस्खे साधे आहेत. माझ्या आईला ते करताना बघून मी शिकले आहे. लहान असताना मला कधीही सर्दी किंवा खोकला झाला की, ती मला वाफ घ्यायला लावायची आणि त्यासाठी पाण्यात आमच्या सगळ्या घराचे आवडते व्हिक्स व्हेपोरब घालायची. मी आजही व्हीव्हीआर वापरते, कारण, त्यात निलगिरी, पुदिना, कापूर आणि ओव्यासारखे वर्षानुवर्षे उपयुक्त ठरत आलेले पदार्थ आहे. चोंदलेले नाक आणि सर्दी यांपासून ते लगेच सुटका करते. मला आतून-बाहेरून उब वाटत राहावी यासाठी वाफ घेतल्यानंतर आई मला लगेच हळद घातलेले दूध प्यायला द्यायची.” 

व्हिक्स व्हेपोरब घालून वाफ घेतल्यानंतर भूमीला किती छान वाटते हे तिने नुकत्याच शेअर केलेल्या पोस्टमध्ये दिसून येते. तिच्या कॅप्शनमध्ये तिने प्रक्रिया स्पष्ट केली आहे, ती वाडगाभर गरम पाण्यात १-२ टीस्पून्स व्हिक्स व्हेपोरब घालते. पाणी गरम घेते, उकळते नाही. मग ती तिच्या डोक्याभवती टॉवेल गुंडाळते आणि ही औषधी वाफ घेऊन चोंदलेले नाक मोकळे करून घेते. व्हिक्स व्हेपोरब घातलेल्या पाण्याची वाफ घेणे प्रौढांसाठी तसेच सहा वर्षांवरील मुलांसाठी सुरक्षित आहे. मात्र, ही वाफ घेऊन सर्दी-खोकला बरा झाला नाही, तर डॉक्टरांचा सल्ला घेणे महत्त्वाचे आहे. 

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading