इंडिया शेल्टर ला मिळाला “हाऊसिंग फायनांस कंपनी लेन्डिंग फॉर अफोर्डेबल हाऊसिंग” पुरस्कार

नवी दिल्ली, दि. ४ – अलीकडेच इंडिया शेल्टर फायनांस कॉर्पोरेशन लिमिटेड ला द इंक्लूजिव फायनांस इंडिया अवॉर्ड येथे “हाऊसिंग फायनांस कंपनी लेन्डिंग फॉर अफोर्डेबल हाऊसिंग” या पुरस्काराने पुरस्कृत करण्यात आले. या सचिवालय सादरीकरण पुरस्कार सोहळ्याचे आयोजन नवी दिल्ली येथे करण्यात आले होते.

किफायतशीर किंमतीत स्वतःचे घर मिळविण्यासाठी  संधीच्या  शोधात असलेल्या, कमी उत्पन्न असलेल्या कुटुंबांना गृह कर्जे उपलब्ध करुन देण्यासाठी  इंडिया शेल्टर फायनांस कॉर्पोरेशन लिमिटेडने  सर्वोत्तम कामगिरी केली आहे.

“हाऊसिंग फायनांस कंपनी लेन्डिंग फॉर अफोर्डेबल हाऊसिंग”  पुरस्काराची निवड संस्थेची पोहोच,मालमत्ता गुणवत्ता,विकास, तसेच देशातील गरीब लोकांना मदत करत त्यांना त्यांच्या हक्काच्या,सुरक्षित आणि सुधारित घरामध्ये प्रवेश मिळवून देत देशाच्या विकासासाठी योगदान देण्याची त्यांची वचनबद्धता या बाबींवर अवलंबून करण्यात आली.

केंदीय अर्थ राज्यमंत्री अनुराग ठाकूर यांच्या हस्ते अनिल मेहता, सीईओ, इंडिया शेल्टर फायनांस कॉर्पोरेशन लिमिटेड यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.

अनिल मेहता यावेळी म्हणाले, आम्ही सुमारे ७०,००० कुटुंबांना मदत केली असून आम्ही जे कार्य करतो, ते सर्वात जास्त प्रभावित आर्थिक उपक्रमांपैकी एक आहे. आम्ही १४ राज्यातील सुमारे १,३०० लोकांना रोजगार उपलब्ध करून देतो आणि भविष्यात आम्ही संपूर्ण देशात आमची उपस्थिती दर्शवू अशी आशा आहे.

Leave a Reply

%d bloggers like this: