परभणी – लाखो रुपयांचा गुटखा जप्त

परभणी, दि. ३ – शहरातील जुना मोंढा परिसरातून बुधवारी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने मोठ्या प्रमाणात गुटख्याचा साठा जप्त केला. स्थानिक गुन्हे शाखेला मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे ही कारवाई करण्यात आली.

स्थानिक गुन्हे शाखेचे सहायक पोलिस निरीक्षक व्यंकटेश आलेवार यांना एका ट्रकमधून मोठ्या प्रमाणात गुटख्याचा साठा शहरात दाखल होत असल्याची माहिती मिळाली होती. त्यांनी ही माहिती जिल्हा पोलिस अधीक्षक जयंत मीना यांना सांगितली. यानंतर अधीक्षक जयंत मीना यांनी पथकाला कारवाईचे आदेश दिले.

पथकातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी बुधवारी जुना मोंढा परिसरातील एका कंटेनरची तपासणी केली. कंटेनर चालकाची चौकशी केली असता त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली. पथकाने ट्रकची (एमपी 09 एचजी 2070) तपासल्यावर त्यात लाखो रुपयांचा गुटख्याचा साठा आढळला आला. फौजदार साईनाथ पुयड, हनुमान जक्केवाड, बालासाहेब समिंदरे, दिलावर पठाण, हरी खुपसे, मधुकर चट्टे, शेख अझहर, संजय घुगे, किशोर चव्हाण, संतोष सानप आदींनी ही कारवाई केली. ट्रकचालकासा ताब्यात घेण्यात आले असून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी अधिक तपास सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.

Leave a Reply

%d bloggers like this: