Saturday, May 30, 2026
MAHARASHTRATOP NEWS

शरजिल उस्मानी सध्या महाराष्ट्रात नाही – अनिल देशमुख

मुंबई, दि. ३ – शरजिल उस्मानी सध्या महाराष्ट्राबाहेर आहे. तो बिहार, उत्तर प्रदेश, गुजरातमध्ये कुठेही असला तरी आम्ही त्याला शोधून अटक करु, असे आश्वासन राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी ट्वीट करुन दिले.

३० जानेवारी या दिवशी पुण्यात झालेल्या एल्गार परिषदेत शर्जील उस्मानीने केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्याची व्हिडीओ क्लिपिंग पोलिसांनी तपासली असून त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे, असे देशमुख म्हणाले. महाराष्ट्र पोलीस सध्या त्याचा शोध घेत आहेत. तो सध्या महाराष्ट्राबाहेर आहे. बिहार, उत्तरप्रदेश, गुजरातमध्ये कुठेही असला तरी आम्ही त्याला शोधून अटक करु, असे अनिल देशमुख यांनी स्पष्ट केले.

शार्जील उस्मानीवर पुण्यातील स्वारगेट पोलिस स्थानकात १५३ अ कलमाअंतर्गत चिथावणीखोर वक्तव्य केल्याबद्दल गुन्हा दाखल करण्यात आला आहे. स्वारगेट पोलीस स्थानकाच्या हद्दीत गणेश कला क्रीडा रंगमंच या ठिकाणी शनिवारी एल्गार परिषदेचे आयोजन करण्यात आले होतते. भारतीय जनता युवा मोर्चाचे पदाधिकारी असणार्‍या प्रदीप गावडे यांनी उस्मानीविरोधात तक्रार दिली होती. ज्यानंतर पुणे पोलिसांनी त्याच्याविरोधात प्रक्षोभक वक्तव्य केल्याबद्दल गुन्हा नोंदवला आहे.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading