पीएमपीची पेपरलेस कामकाजाकडे वाटचाल

पीएमपीच्या सर्व सेवकांना पगार स्लिप मिळणार आता मोबाईल अँप वर

पुणे, दि. ४ – पुणे महानगर परिवहन महामंडळाची अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक डॉ. राजेंद्र जगताप आणि सहव्यवस्थापकीय संचालक डॉ. चेतना केरुरे यांच्या पुढाकाराने पेपरलेस कामकाजाकडे वाटचाल सुरू झाली आहे. पीएमपीच्या लेखा विभागामध्ये नवीन ” पे रोल ” प्रणाली विकसित करून या प्रणालीचा वापर सुरू करण्यात आला आहे. पीएमपीएमएल च्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना यापूर्वी मिळणाऱ्या कागदावर प्रिंट केलेल्या पेमेंट स्लिप ऐवजी आता त्यांना त्यांच्या मोबाईलवर नवीन पे रोल प्रणालीद्वारे एका क्लिकवर डिजिटल पेमेंट स्लिप मिळणार आहे.

या नवीन पे रोल प्रणालीमुळे पीएमपीएमएल च्याअधिकारी व कर्मचारी वर्गाला खालील फायदे होणार आहेत.
◆प्रत्येक कर्मचारी पगार मिळण्यापूर्वी अँप मध्ये स्वतःची संपूर्ण महिन्याची हजेरी पाहू शकतो.
◆बँक खात्यात पगार जमा झाल्यावर अँप मध्ये पे स्लिप पाहता येणार व डाउनलोड ही करता येणार.
◆लेखा विभागामध्ये पे स्लिप साठी लागणारा कागद, प्रिंटर, स्टेशनरी यावर होणारा खर्च वाचणार.
◆पे स्लिप तयार करण्यासाठी लागणाऱ्या वेळेत देखील बचत होणार.
◆यापूर्वी एखाद्या कर्मचाऱ्याची पेमेंट स्लिप हरवल्यास अर्ज करून मिळवावी लागत होती.
◆आता मोबाईल अँपवरून कोणत्याही महिन्याची पेमेंट स्लिप पाहिजे त्या वेळी आणि पाहिजे तेवढ्या वेळा एका क्लिक वर उपलब्ध होईल.
◆पीएमपीएमएल कडील कामगारांची संख्या विचारात घेता पगाराच्या कामकाजाचे व्याप मोठे आहे. आता हे काम ऑनलाईन झाल्यामुळे लेखा विभागातील व सर्व आगार स्तरांवरील लेखनिक यांचे काम सोपे झाले आहे.

Leave a Reply

%d bloggers like this: