पीएमपी कडून नांदूरगाव ते उरुळी कांचन बससेवा सुरू

नांदूर ग्रामस्थांकडून बससेवेचे उत्साहात स्वागत

पुणे, दि. २ – पुणे महानगर परिवहन महामंडळ अर्थात पीएमपीएमएल कडून नांदूरगाव ते उरुळी कांचन अशी बससेवा दि. २ फेब्रुवारी २०२१ पासून सुरू करण्यात आली. पीएमपीएमएलचे संचालक व नगरसेवक शंकर पवार, नांदूर गावच्या सरपंच लताताई थोरात, उपसरपंच रविंद्र बोराटे, पोलीस पाटील नेहाताई बोराटे यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून या नवीन बसमार्गाचे उदघाटन करण्यात आले.

यावेळी दौंड तालुक्याचे माजी उपसभापती सुशांत दरेकर, दौंड तालुका खरेदी विक्री संघाचे माजी अध्यक्ष विठ्ठल घुले, बबनराव बोराटे, पवार ऍग्रो रिसॉर्टचे डॉ. सुनिल पवार व भाग्यश्री पवार, पीएमपीएमएलचे मुख्य लेखा व वित्त अधिकारी योगेश होले, पीएमपीएमएल चे पास विभाग प्रमुख व हडपसर आगाराचे प्रभारी व्यवस्थापक विक्रम शितोळे, कामगार व जनता संपर्क अधिकारी सतिश गाटे यांच्यासह नांदूर ग्रामपंचायतीचे आजी माजी पदाधिकारी यांची प्रमुख उपस्थिती होती.

नांदूरगाव ते उरुळी कांचन या बससेवेचा नांदूर व सहजपुर पंचक्रोशीतील शेतकरी, विद्यार्थी, नांदूर एम. आय. डी. सी. तील नोकरदार वर्ग, दूध व्यावसायिक यांना चांगला लाभ होणार आहे. सध्या दर दीड तासाला ही बससेवा असणार आहे.पीएमपीएमएलचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक डॉ. राजेंद्र जगताप यांनी ही बससेवा सुरू करून या भागातील नागरिकांना दिलासा दिला आहे. यावेळी बोलताना शंकर पवार म्हणाले, नांदूरगाव ते उरुळी कांचन बससेवेला चांगला प्रतिसाद मिळाल्यास दर अर्ध्या तासाला बससेवा उपलब्ध करून देऊ. या मार्गावर चालक व वाहक यांनी प्रवाशांना ‘हात दाखवा बस थांबवा’ या धर्तीवर ज्येष्ठ नागरिक , विद्यार्थी, महिला, नोकरदार वर्ग यांना चांगली सेवा देऊन पीएमपीएमएल चे उत्पन्न वाढवावे. विद्यार्थिनींच्या लेझीम पथकाच्या व ढोल ताशांच्या गजरात पीएमपीएमएलची बस नांदूर गावातून मार्गस्थ झाली. कार्यक्रमास माजी सरपंच पोपटराव बोराटे, युवराज बोराटे, नामदेव बोराटे, बापूराव गायकवाड, ग्रामपंचायत सदस्य विशाल थोरात, प्रविण बोराटे, किशोर बोराटे, शीतल बोराटे, आप्पासो घुले, कैलास गायकवाड, संतोष बोराटे, विशाल घुले, शिवाजी घुले, दत्तात्रय बर्वे, भीमराव थोरात, विजय ठोंबरे यांच्यासह ग्रामस्थ, शिक्षक, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave a Reply

%d bloggers like this: