सोनालिकाने जानेवारी महिन्यांत १०१५८ ट्रॅक्टर्सच्या विक्रीचा उच्चांक गाठला

पुणे -वर्षाची सुरवात दमदार पद्धतीने करत, सोनालिका ट्रॅक्टर्सने २०२१ वर्षामध्ये नवनवे उच्चांक गाठण्यासाठीचा प्रवास आता अधिक जलदगतीने सुरू केला आहे. जानेवारी २०२० मध्ये झालेल्या विक्रीच्या तुलनेत ७२२० ट्रॅक्टर्सची अधिक व एकूण १०१५८ ट्रॅक्टर्सची विक्री करत जानेवारी महिन्यांतील उच्चांक गाठत सोनालिकाने आपल्या दमदार कामगिरीची नोंद केली आहे. देशांतर्गत बाजारपेठेमध्ये जानेवारी २०२१ मध्ये सोनालिकाने ८१५४ ट्रॅक्टर्सची विक्री केली असून ती जानेवारी २०२० च्या तुलनेत ४६ टक्के अधिक आहे. जानेवारी २०२० मध्ये एकूण ५५८५ ट्रॅक्टर्सची विक्री झाली होती. 

सोनालिका हा देशातील क्रमांक एकची ट्रॅक्टर निर्यात कंपनी आणि सर्वाधिक वेगाने विकास होत असलेली अग्रगण्य ट्रॅक्टर उत्पादक कंपनी आहे. जगभरातील शेतकऱ्यांच्या गरजा लक्षात घेऊन अत्यल्प दरामध्ये त्या पूर्ण करणे, शेतीमध्ये आधुनिक तंत्रज्ञानाधारित क्रांती घडवून आणण्यासाठी सोनालिकाने नेहमीच पुढाकार घेतला आहे. या उपक्रमांचा एक भाग म्हणून जानेवारी २०२१ मध्ये सोनालिका ट्रॅक्टर्सने सिकंदर डीएलएक्स पोटॅटो स्पेशल एडिशन सिरीज सादर केली आहे. बटाट्याची शेती करताना ५जी तंत्रज्ञानाने नियंत्रित करू शकणाऱ्या कंट्रोल व्हाॅल्व्ह आणि अत्युच्च दर्जाच्या हायड्राॅलिक्सच्या मदतीने चांगल्या पद्धतीने सेन्सिंग करता येईल असा पर्याय हा अत्याधुनिक ट्रॅक्टर शेतकऱ्यांना उपलब्ध करून देत आहे. कंपनीने २०२० वर्षभरामध्ये अशाच प्रकारची पाच प्रिमियम ट्रॅक्टर्स – टायगर, सिकंदर डीएलएक्स, छत्रपती, महाबली आणि टायगर इलेक्ट्रिक सादर केले होते आणि आधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीने शेतकऱ्यांची भरभराट करण्याच्या उद्दिष्टाने काम केले होते. 

कंपनीच्या या अभिनव उपक्रमांविषयी बोलताना रमण मित्तल, कार्यकारी संचालक, सोनालिका ग्रुप म्हणाले, ट्रॅक्टर्ससाठी अत्याधुनिक तंत्रज्ञान विकसित करण्यासाठी सोनालिका कंपनी कटिबद्ध आहे आणि त्याची अंमलबजावणीसुद्धा जबाबदारीने करत आहे. उत्पादनाची एकूण किंमत न वाढवता आमच्या ग्राहकाची उत्पादकता भरभरून आणि सकारात्मक पद्धतीने वाढविण्याचे उद्दिष्ट आम्ही शेतीच्या आधुनिकीकरणाद्वारे ठेवले आहे. या उत्पादनांमध्ये आता अष्टपैलू अशा सिकंदर डीएलएक्स पोटॅटो स्पेशल सिरीज या बटाटा उत्पादक शेतकऱ्यांसाठी खास विकसित केलेल्या ट्रॅक्टर उत्पादनाचा समावेश आहे. जागतिक पातळीवर शेती क्षेत्रात बदल घडवून आणण्यासाठी आणि शेतकऱ्यांना केंद्रस्थानी ठेवून वाटचाल करण्याच्या कंपनीच्या धोरणांचे एक उदाहरण म्हणून या नव्या स्पेशल एडिशन सिरिजकडे पाहता येईल.

ग्राहक-केंद्रित असल्यामुळे कंपनीने पाच नवीन प्रिमियम ट्रॅक्टर्स २०२० मध्ये बाजारात आणले. या उत्पादनांच्या आधारे शेतकऱ्यांच्या गरजा अत्यल्प दरामध्ये भागविण्यात कंपनीला यश आले. या उत्पादनांमध्ये टायगर, सिकंदर डीएलएक्स, महाबली आणि छत्रपती सिरिज या डिझेल इंधनावरील ट्रॅक्टर्सचा समावेश होता. त्यामध्ये सोनालिका टायगर इलेक्ट्रिक या भारतातील पहिल्या फिल्ड-रेडी इलेक्ट्रिक ट्रॅक्टरची आणि भारतातील सर्वाधिक परवडणाऱ्या अशा चारचाकी इव्हीची भर पडली आहे.

Leave a Reply

%d bloggers like this: