Tuesday, June 16, 2026
PUNE

अमेरिकन युनिव्हर्सिटी आणि नेल्सन मंडेला ग्लोबल पीस अवॉर्डने पुण्याचे प्रसन्न मोरे सन्मानित

पुणे : अमेरिकन युनिव्हर्सिटी आणि नेल्सन मंडेला ग्लोबल पीस अवॉर्ड अकॅडमीच्या वतीने पुण्यातील प्रसन्न दीपक मोरे यांना केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या हस्ते डॉक्टरेट उपाधी देण्यात आली, त्यांना नेल्सन मंडेला ग्लोबल पीस अवॉर्ड ही देऊन सन्मानित करण्यात आले आहे.

भारतासह जगभरात 2020 मध्ये कोरोनाचे मोठे संकट निर्माण झाले असताना अशा कोरोना महामारीच्या संकट काळात संपुर्ण भारतात सामान्य जनतेच्या मदतीला विशेष सामाजिक कार्यकर्ते धावून गेले या काळात अनेकांनी उल्लेखनीय कार्य केले, अशांची दखल घेत अमेरिकन युनिव्हर्सिटी आणि नेल्सन मंडेला ग्लोबल पीस अवॉर्ड अकॅडमीच्या वतीने देशभरातील सुमारे 53 जणांना नेल्सन मंडेला ग्लोबल पीस अवॉर्ड देऊन सन्मानित करण्यात आले. तसेच 32 लोकांना डॉक्टरेट उपाधी देण्यात आली. यामध्ये पुण्याचे वायर्डअसेट्स मल्टीट्रेड प्रायव्हेट लिमिटेडचे सीईओ. प्रसन्न दीपक मोरे यांचाही समावेश होता. केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री आणि रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे अध्यक्ष रामदास आठवले यांच्या हस्ते प्रसन्न मोरे यांना डॉक्टरेट उपाधी आणि नेल्सन मंडेला ग्लोबल पीस अवॉर्डने सन्मानित करण्यात आले. हा कार्यक्रम नेल्सन मंडेला ग्लोबल पीस अवॉर्ड अकॅडमीचे संस्थापक राजकुमार टाक यांच्या वतीने मुंबई येथे आयोजित करण्यात आला होता. यावेळी प्रसन्न मोरे यांच्या सेाबत अजित विठ्ठल भोसले उपस्थित होते.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading