‘वागले की दुनिया’ नवीन स्वरूपात प्रेक्षकांच्या भेटीला

भारतीय टेलिव्हिजनच्‍या इतिहासामधील अनेक मालिका प्रेक्षकांच्या मनावर राज्य करत आहेत. अशीच एक मालिका म्हणजे ‘वागले की दुनिया’. या मालिकेमधील आपलेसे वाटणारे कथानक आणि सुरेखरित्‍या सादर करण्‍यात आलेल्‍या पात्रांनी देशाला एका सामान्‍य व्‍यक्‍तीच्‍या साध्‍यासोप्‍या कथेच्‍या प्रेमात पडण्‍यास भाग पाडले होते. या आर. के. लक्ष्‍मण यांच्‍या कथेला आता नवीन स्‍वरूप मिळणार आहे, कारण सोनी सब सादर करत आहे ‘वागले की दुनिया – नयी पीढी नये किस्‍से’ ८ फेब्रुवारीपासून रात्री ९ वाजता.

भारताला हसवून-हसवून लोटपोट केलेल्‍या मालिकेची मूल्ये व प्रेमळ आठवणींना उजाळा देत सोनी सब माजी प्रशंसित वागले जोडी अंजन श्रीवास्‍तव ऊर्फ श्रीनिवास वागले आणि भारती आचरेकर ऊर्फ राधिका वागले या जुन्‍या पिढीला सादर करत आहे. कथा तेथूनच पुढे सरकवण्‍यात आली आहे आणि वागले व कुटुंबाच्‍या नवीन पिढीसह आजच्‍या काळात सादर करण्यात येत आहे. ‘वागले की दुनिया’च्‍या नवीन युगामध्‍ये श्रीनिवासचा मुलगा राजेश वागले या प्रमुख भूमिकेत सुमीत राघवन आणि त्‍याची पत्‍नी वंदना वागलेच्‍या भूमिकेत परिवा प्रणती आहे. दररोज नवीन आठवणी निर्माण करणारी मालिका ‘वागले की दुनिया’ राजेश वागलेच्या तो दररोज सामना करत असलेल्‍या समस्‍या व घटनांबाबतच्या दृष्टिकोनाला दाखवते. ज्‍यामुळे ही मालिका आजच्‍या प्रेक्षकांना आपलीशी वाटते.

जे. डी. मजेठियाच्‍या हॅट्स ऑफ प्रॉडक्‍शनची निर्मिती असलेली ‘वागले की दुनिया – नयी पीढी, नये किस्‍से’ साधा-सरळ, कुटुंबातील प्रेमळ व्‍यक्‍ती राजेश वागलेच्‍या अवतीभोवती फिरणारी व जीवनाचे सार दाखवणारी मालिका आहे. त्‍याची स्‍वत:साठी व त्‍याच्‍या कुटुंबासाठी उत्तम जीवनशैली असण्‍याची महत्त्वाकांक्षा आहे, तरीदेखील तो काळासोबत जोखीम पत्‍करत पुढे जाण्‍याबाबत संकोच करतो. मालिका आजच्‍या मध्‍यमवर्गीय कुटुंबातील संस्‍कार व विनम्र संगोपनाला, तसेच त्‍यांचे दैनंदिन जीवन व समस्‍यांना दाखवते. बदलत्‍या पिढीसह समस्‍यांचे स्‍वरूप देखील बदलले आहे. आजचा मध्‍यमवर्गीय व्‍यक्‍ती प्रगतीशील व काळाशी जुळवून घेणारा आहे. तसेच त्‍यांना गतकाळाच्‍या तुलनेत नवीन समस्‍यांचा सामना करावा लागतो.

Leave a Reply

%d bloggers like this: