यशासाठी कठोर परिश्रम, समर्पित वृत्ती गरजेची – कल्याण जाधव

पुणे : “जीवनात अपयश, अडचणींना सामोरे जावेच लागते. त्यातून धडा घेत अडचणींतून नव्या संधी शोधाव्यात. जीवनात यशस्वी होण्यासाठी जिद्द, कठोर परिश्रम, समर्पित वृत्ती महत्वाची असते,” असे मत उद्योजक आणि केजे शिक्षण संस्थेचे अध्यक्ष कल्याण जाधव यांनी व्यक्त केले.

येवलेवाडी येथील केजे शिक्षण संस्थेत ७२ वा प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा झाला. यावेळी संस्थेतील सर्व शिक्षक-शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या वतीने कल्याण जाधव यांचा वाढदिवसाच्या निमित्ताने सत्कार करण्यात आला.

प्रसंगी संस्थेच्या व्यवस्थापकीय संचालिका हर्षदा जाधव, विभावरी जाधव, कॅम्पस संचालक डॉ. व्यासराज काखंडकी, केजे कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड मॅनेजमेंटचे प्राचार्य डॉ. सुहास खोत, ट्रिनिटी अकॅडमी ऑफ इंजिनिअरिंगचे प्राचार्य डॉ. निलेश उके, ट्रिनिटी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड रिसर्चचे प्राचार्य डॉ. अभिजित औटी, ट्रिनिटी कॉलेज ऑफ आर्किटेक्चरचे प्राचार्य प्रा. बी. एस. केशव, ट्रिनिटी पॉलिटेक्निकचे प्राचार्य प्रा. गणेश इंगोले, ट्रिनिटी इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट रिसर्चच्या संचालिका डॉ. प्रीती शर्मा, ट्रिनिटी ज्युनिअर कॉलेजच्या प्राचार्य रुपाली ढमढेरे, ट्रिनिटी कॉलेज ऑफ फार्मसीचे प्राचार्य डॉ. एस. आर. चौधरी आदी उपस्थित होते.

कल्याण जाधव म्हणाले, “छोट्याशा खेड्यातून येऊन जिद्दीने शिक्षण घेतले. परिस्थितीअभावी मर्यादित संधी मिळाल्या. पण मिळालेल्या संधीचा लाभ घेत कंत्राटी काम सुरू केले. कठोर परिश्रम, कामातील प्रामाणिकता आणि गुणवत्ता याच्या जोरावर इथवर पोहोचलो. सामाजिक जाणिवेतून सर्वसामान्य मुलांना शिक्षण देण्याच्या उद्देशाने केजे शिक्षण संस्था उभारली. यातही अनेक अडचणी येतात. मात्र, आपल्या सर्वांच्या सहकार्याने गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्याचा प्रयत्न करत आहोत. रोजगरक्षम आणि कौशल्यपूर्ण युवक घडविण्याचे आपले ध्येय आहे.”

हर्षदा जाधव, विभावरी जाधव, डॉ. व्यासराज काखंडकी, डॉ. सुहास खोत यांच्यासह इतर मान्यवरांनी मनोगते व्यक्त केली. कल्याण जाधव यांना सर्वांनी शुभेच्छा दिल्या. केक कापून वाढदिवस साजरा करण्यात आला.

Leave a Reply

%d bloggers like this: