बुद्धिबळ स्पर्धेत गौरव झगडेने पटकाविले विजेतेपद

पुणे, दि. २८ – गौरव झगडे याने विनायक नवयुग मित्र मंडळ ट्रस्ट आणि हिंद शक्ती सोशल फाउंडेशन आयोजित १२व्या खुल्या जलद  बुद्धिबळ स्पर्धेत ६.५ गुणांसह विजेतेपद पटकावले. भांडारकर रस्त्यावरील मिलेनियम टॉवर येथे ही स्पर्धा झाली. स्पर्धेचे उद्घाटन आमदार सिद्धार्थ शिरोळे आणि अजय बदामीकर यांच्या हस्ते झाले. पुणे जिल्हा बुद्धिबळ संघटनेचे कार्याध्यक्ष कै. जोसेफ डिसुझा यांना यावेळी श्रद्धांजली वाहण्यात आली.


स्पर्धेच्या पारितोषिक वितरण प्रसंगी भारतीय आॅलिम्पिक संघटनेचे सहसचिव नामदेव शिरगावकर, अभिनेते प्रविण तरडे, राजेश पांडे, सुधीर जवळेकर, निरंजन गोडबोले, विनीता श्रोत्री,सँतोली डिसूझा,सुनील पांडे, गुणेश साने,राजेंद्र शिदोरे, दीप्ती शिदोरे, अभिजीत मोडक, वरुण जकातदार,समीर हाळंदे, पराग ओझा उपस्थित होते.  स्पर्धेतील खुल्या गटात गौरव झगडे याने सहा फेºया जिंकल्या, तर सातव्या आणि अखेरच्या फेरीत त्याला सौरभ म्हामणेने बरोबरीत रोखले. सौरभ सहा गुणांसह दुसºया, तर सोहम दातार सहा गुणांसह तिसºया क्रमांकावर राहिला. विकास शर्मा, नमीत चव्हाण, निखिल दीक्षित प्रत्येकी साडेपाच गुणांसह अनुक्रमे चौथ्या, पाचव्या आणि सहाव्या क्रमांकावर राहिले. स्पर्धेतील विजेत्यांना करंडक, रोख पारितोषिक, आणि पदके देण्यात आली. स्पर्धेतील १८ वर्षांखालील गटातील सर्वोत्तम खेळाडूचा मान आर्यन शहा (५ गुण), १६ वर्षांखालील गटात शिवराज पिंगळे (५ गुण) यांनी मिळविला. १४ वर्षांखालील गटात अनया रॉय (५ गुण), तर १२ वर्षांखालील गटात अक्षय बोरगावकर (५ गुण) यांनी सर्वोत्तम खेळाडूचा मान मिळवला. सर्वोत्तम बिगरमानांकित खेळाडूंमध्ये संजय अतकरने (५) बाजी मारली, तर सर्वोत्तम महिला खेळाडूचा मान धनश्री खैरमोडेने (४.५ गुण) मिळवला. यावेळी केविन डिसूझा पदक देऊन याचा विशेष  गौरव करण्यात आला.

सातव्या फेरीचे काही निकाल – गौरव झगडे (६.५) बरोबरी वि. सौरभ म्हामणे (६), सोहम दातार (६) वि. वि. आर्यन शहा (५), केवल निर्गुण (५) पराभूत वि. विकास शर्मा (५.५), निखिल दीक्षित (५.५) वि. वि. धनश्री खैरमोडे (४.५), ओम लामकाणे (५) बरोबरी वि. सिद्धान्त गायकवाड (५), नमीत चव्हाण (५.५) वि. वि. धीरेन मोर (४.५), श्रेयस हापसे (५) वि. वि. ओंकार पाटील (४.५), ओंकार देशपांडे (४) पराभूत वि. गौरव बाकलीवाल (५), अनया रॉय (५) वि. वि. सिद्धान्त ताम्हणकर (४), मिहीर सरवदे (५) वि. वि. अदिती वाव्हळ (४), अनुज दांडेकर (४) पराभूत वि. अक्षय बोरगावकर (५), शार्दूल गोडबोले (४) पराभूत वि. शिवराज पिंगळे (५).

Leave a Reply

%d bloggers like this: