Tuesday, June 16, 2026
PUNE

सुबुद्ध मित्र मंडळाच्या प्रजासत्ताक सोहळ्यात कोविड  योद्ध्यांचा गौरव 

पुणे : सुबुद्ध मित्र मंडळाच्या प्रजासत्ताक सोहळ्यात कोविड साथीच्या काळात समाजोपयोगी काम करणाऱ्या   योद्ध्यांचा गौरव  करण्यात आला . शिवसेना प्रभाग क्र.१८ चे प्रमुख पै.भरत चौधरी आयोजित हा कार्यक्रम मंगळवारी सकाळी शुक्रवार पेठ जैन मंदिराशेजारी झाला. कोविड साथीच्या  काळात २८० अंत्यविधी करणारे साबीर सय्यद ,साबीर शेख,  तसेच  दीपक बीडकर,प्रमोद गव्हाणे,विक्रांत गवळी,सोमनाथ काची, सुलक्षणा नाईक यांचा सत्कार करण्यात आला.रक्तदान, रिक्षा सेवा,बँक सेवा ,शिक्षण सेवा, म.न.पा. कर्मचारी सेवा ,भाजीपाला सेवा, सामाजिक कार्य,विद्युत विभाग सेवा  अशासाठी अनेकांचा सत्कार करण्यात आला .अंबादास चौधरी  यांनी सूत्रसंचालन केले .कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी  अण्णा कुंजीर, अजिम खान,सोमनाथ टेंबेकर,भागणे बंधू , स्वप्निल  आंग्रे यांनी परिश्रम घेतले.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading