अली दारूवाला यांची भाजपच्या प्रदेश प्रवक्तेपदी नियुक्ती 

पुणे : भारतीय जनता पक्षाच्या अल्पसंख्य आघाडीचे पुणे शहर  प्रभारी  अली दारूवाला यांची भारतीय जनता पक्षाच्या प्रदेश प्रवक्तेपदी नियुक्ती करण्यात आली आहे. प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी दारूवाला यांना नियुक्तीचे पत्र दिले.

मराठी ,हिंदी ,इंग्रजी वृत्त वाहिन्या ,छापील प्रसारमाध्यमांसाठी ते काम पाहतील.  भारतीय जनता पक्षाच्या अल्पसंख्य आघाडी च्या प्रदेश उपाध्यक्षपदीही त्यांची नियुक्ती आघाडीचे प्रदेशाध्यक्ष एजाज देशमुख यांनी केली असून दारूवाला यांच्याकडे पश्चिम महाराष्ट्राची जबाबदारी देण्यात आली आहे. नुकतीच त्यांची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या थिंक टॅंक मध्ये अल्पसंख्याक कोअर  समितीमध्ये  नियुक्ती करण्यात आली आहे . या व्यतिरिक्त राम मंदिर उभारणी साठी स्थापन करण्यात आलेल्या निधी संकलन समितीमध्येही त्यांचा समावेश करण्यात आला आहे . दारूवाला हे ऑल इंडिया  पेट्रोल डीलर्स असोसिएशन(नवी दिल्ली ) चे राष्ट्रीय प्रवक्ते आहेत. 
 

Leave a Reply

%d bloggers like this: