अल्पसंख्यांक व प्रौढ शिक्षण विभागाचा शाळा भेट उपक्रम

पुणे : महाराष्ट्र कॉस्मॉपॉलिटन एज्युकेशन सोसायटीच्या अँग्लो उर्दू बॉईज हायस्कुलमध्ये अल्पसंख्यांक व प्रौढ शिक्षण विभागाच्या तर्फे दि. 20 जानेवारी रोजी शाळा भेटीचे आयोजन करण्यात आले होते.

यावेळी शिक्षण उपसंचालक राजेश क्षीरसागर , वरीष्ठ तंत्रज्ञ आशुतोष पाटील उपशिक्षणाधिकारी मंगल वाव्हळ , जिल्हा परिषद विस्तार अधिकारी जयश्री प्रकाश दोंदे ,विस्तार अधिकारी मंगल गोतारणे उपस्थित होते. महाराष्ट्र कॉस्मॉपॉलिटन एज्युकेशन सोसायटीचे सहसचिव इरफान शेख, मुख्याध्यापक परवीन शेख यांच्या हस्ते पाहुण्यांचे स्वागत करण्यात आले. या वेळी शाळेत वर्षभर होत असलेल्या मराठी विषयाच्या उपक्रमाबाबत सादरीकरणा द्वारे माहिती देण्यात आली. क्षीरसागर यांनी शाळेतील विद्यार्थ्यांच्या अल्पसंख्यांक शिष्यवृत्ती संबंधी व एकंदरीत कामकाजाबाबत समाधान व्यक्त केले.

Leave a Reply

%d bloggers like this: