Saturday, May 30, 2026
PUNE

विश्व मराठी संमेलनची तयारी अंतिम टप्प्यात

पुणे – विश्व मराठी परिषदेतर्फे आयोजित विश्व मराठी संमेलनाची तयारी अंतिम आली आहे. हे संमेलन २८ ते ३१ जानेवारी दरम्यान “विश्व मराठी वाणी” या युट्युब चॅनेलवर युट्युब लाईव्ह होणार आहे. हे संमेलन साहित्य, संस्कृती, उद्योजकता आणि युवा या चार विषयांवर प्रकाश टाकणारे असणार आहे.

या संमेलनमध्ये ३५ देशातील महाराष्ट्र मंडळे, अमेरिकेतील ५० राज्यातील बृहन्महाराष्ट्र मंडळाच्या शाखा, बृहन्महाराष्ट्र मंडळ न्यु दिल्ली, भारतातील २७ राज्ये तसेच १२०० हून अधिक महाविद्यालये, ८०० हून अधिक शाळा, ५०० हून अधिक वाचनालये आणि १५० हून अधिक संस्था यामध्ये सहभागी होत आहेत. महासंमेलनाध्यक्ष ज्येष्ठ अणुशास्त्रज्ञ डॉ. अनिल काकोडकर, महास्वागताध्यक्षा लोकसभेच्या माजी सभापती सुमित्राताई महाजन, बृहन्महाराष्ट्र मंडळ नॉर्थ अमेरिकेच्या अध्यक्षा विद्या जोशी यांच्या सोबत विविध देशातील ८ संमेलनाध्यक्ष आहेत.

२८ जानेवारी २०२१ – विश्व मराठी साहित्य संमेलन

२९ जानेवारी २०२१ – विश्व मराठी संस्कृती समेलन

३० जानेवारी २०२१ – विश्व मराठी उद्योजकता संमेलन

३१ जानेवारी २०२१ – विश्व मराठी युवा संमेलन

संमेलनामध्ये चारही दिवस विविध परिसंवाद होणार आहेत.

  परिसंवाद विषय व वक्ते 

  • साहित्य विषयक परिसंवाद 
  • परिसंवाद विषय : मराठी भाषा आणि साहित्य : आव्हाने आणि संधी
  • वक्ते : डॉ. विश्वास मेहेंदळे, विवेक सावंत, दिलीप करंबळेकर, अनिल गोरे (मराठीकाका), नीलिमा बोरवणकर 
  • परिसंवाद विषय : भाषा साहित्य आणि संवादाची नवतंत्रज्ञाने
  • वक्ते : प्रसाद मिरासदार, डॉ. दीपक शिकारपूर, डॉ. समिरण वाळवेकर, अतुल कहाते
  • परिसंवाद विषय : भारताबाहेरील मराठी साहित्य, साहित्यिक कर्तुत्व आणि आदानप्रदान
  • वक्ते : लीना सोहोनी, नलिनी जोशी (अमेरिका), डॉ. उमा कुलकर्णी, अनिल नेने, नोहा मस्सील (इस्त्राईल), केदार लेले (लंडन)
  • परिसंवाद विषय : साहित्य व्यवहाराचे संस्थात्मक वास्तव
  • वक्ते : पद्माकर कुलकर्णी, कल्याण शिंदे, विनोद कुलकर्णी, राजन लाखे, डॉ. श्रीपाद भालचंद्र जोशी
  • संस्कृती विषयक परिसंवाद 
  • परिसंवाद विषय : वैश्विक परिघात मराठी कला आणि संस्कृती
  • वक्ते :  पं. विकास कशाळकर,पं. मनिषा साठे, प्रिया आपटे (स्वित्झर्लंड), ओंकार पवार
  • परिसंवाद विषय : संस्कृती आधारित विकास
  • वक्ते : गिरीश प्रभुणे, राहुल सोलापूरकर, भुजंगराव बोबडे, अपर्णा पाटील, अपर्णा मोहिले
  • परिसंवाद विषय : लोकसंस्कृती लोकपरंपरा आणि मराठी समाज
  • वक्ते: डॉ. प्रवीण भोळे, डॉ.गणेश चंदनशिवे, विभिषण चावरे, चारुदत्त आफळे, ऐश्वर्या कोकाटे (यू.एस.ए)
  • उद्योजकता विषयक परिसंवाद 
  • परिसंवाद विषय : मराठी माणसाची उद्योजकता: वास्तव आणि संधी
  • वक्ते :  रविंद्र प्रभुदेसाई, पंकज कठाने, शंतनू खानवेलकर, वृंदा ठाकूर (नेदरलँड)
  • परिसंवाद विषय : देश-विदेशातील मराठी उद्योजक: कार्य आणि कर्तृत्व
  • वक्ते : संजीव पेंढारकर, जयंती कठाळे, आर आर देशपांडे, संजीवनी पाटील (दुबई)
  • परिसंवाद विषय : मराठी उद्योजकतेच्या विकासासाठी सहाय्य करणाऱ्या संस्था
  • वक्ते: सौ. कल्पना पंत, श्री. सुरेश लोंढे, श्री. संदीप पाध्ये (शार्लेट, अमेरिका ), रवींद्र गाडगीळ (लंडन, इंग्लंड)
  • परिसंवाद विषय : कृषी उद्योजकता 
  • वक्ते:  डॉ. परशराम पाटील (एशियन डेव्हलपमेंट बँक), डॉ. प्रवीण पाटील(म्युनिक जर्मनी), श्री. प्रसाद देशपांडे (शेतकरी डायरी)
  • युवा विषयक परिसंवाद 
  • परिसंवाद विषय : मराठी युवक विश्वाचा नायक- मराठी युवाशक्ती- समन्वय आणि संवर्धन
  • वक्ते :  प्रा. क्षितीज पाटुकले, विवेक वेलणकर, डॉ. नरेंद्र जोशी, निखिल वाळकीकर, अमित वाईकर (शांघाई, चीन)
  • परिसंवाद विषय : शिवछत्रपती आणि मराठी साम्राज्याचा आदर्श घेऊन मराठी युवकांनी क्षमता आणि सामर्थ्य कसे वाढवावे?
  • वक्ते : डॉ. अजित आपटे, पांडुरंग बलकवडे, मोहन शेटे, पराग टोपे (यू. एस. ए.)
  • परिसंवाद विषय : सक्षम, संपन्न, समृद्ध वैश्विक मराठी भाषिक समाज
  • वक्ते: संजय सोनवणी, वंदन नगरकर, परिक्षित प्रभुदेसाई, नितिन कुलकर्णी (लंडन)

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading