भाजपा राजस्थान आघाडीच्या शहराध्यक्ष पदी जयप्रकाश पुरोहित
पुणे – सध्या भारतीय जनता पार्टी च्या विविध कार्यकारणी जाहीर होत आहेत .पुणे शहरात राजस्थानी समाज फार मोठ्या प्रमाणात आहे .या समाजाची मते ही बऱ्याच प्रभागात लक्षणीय वाढली आहेत .यामुळेच भारतीय जनता पार्टीने राजस्थानी आघाडी सुरू केली आहे या आघाडीचे अध्यक्षपदी जयप्रकाश पुरोहित यांची निवड केली आहे .
जयप्रकाश पुरोहित गेली 30 वर्षे भारतीय जनता पक्षात सक्रिय काम करीत आहेत .त्यांचे वडिल सुद्धा भारतीय जनता पक्ष्याचे सक्रिय कार्य करीत होते. जयप्रकाश पुरोहित हे ताडीवाला रोड सारख्या वस्तीत खूप वर्षे काम करीत आहेत.शिवाय ते प्रभाग समितीचे सभासद म्हणून ही कार्यरत आहेत .त्यांच्या कार्याची दखल घेऊन पक्षाने त्यांना अजून नवीन जबाबदारी दिली आहे.त्यांना नुकतेच नियुक्तीचे पत्र पक्ष कार्यालयात अध्यक्ष जगदीश मुळीक ,रवी अनासपुरे ,राजेश पांडये यांच्या हस्ते देण्यात आले .
